देशात मागील दहा दिवसांमध्ये नऊ वेळा इंधनदरवाढ झाली आहे. आज सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. असं असतानाच आज संसदेच्या आवरामध्ये काँग्रेसचे आमदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने महागाईविरोधात आंदोलन केलं. काँग्रेसने यावेळेस देशभरात महागाईच्या मुद्द्यावरुन देशभरामध्ये सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतारणार असल्याचा इशारा दिलाय. या आंदोलनाच्या वेळेस काँग्रेसच्या खासदरांनी एका बाईकला हार घालून प्रतिकात्मक पद्धतीने निषेध नोंदवला. बाईकला हार घालणाऱ्या काँग्रेस खासदारांमध्ये राहुल गांधींचाही समावेश होता.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: पेट्रोल-डिझेलपेक्षा फारच स्वस्त… गडकरींच्या Hydrogen कारचं Average पाहिलं का?

गॅसची दरवाढ मागे घ्या, गरिबांना लुटणं बंद करा, महागाई वाढवणं बंद करा, मोदी सरकार हाय हाय, तानाशाही नही चलेगी अशापद्धतीच्या घोषणा देत काँग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या आवारात आंदोलन केलं. यावेळेस काँग्रेस खासदारांच्या हातामध्ये २०१४ मधील इंधनाचे दर आणि आताचे दर दाखवणारे पोस्टर्सही होते. तसेच ‘निवडणूक संपली, लूट सुरु झाली,’ अशा अर्थाचे पोस्टर्सही खासदारांनी पकडले होते.

नक्की वाचा >> “पेट्रोलचं नाव बदलून…”; काँग्रेसने केलेली मागणी चर्चेत; हजारो लोकांनी शेअर केली पोस्ट

“आमच्या काँग्रेसचे खासदार आणि वेगवेगळ्या राज्यांमधील नेते पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन करत आहेत. मागील दहा दिवसांमध्ये नऊ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवण्यात आलाय. याचा थेट फटका गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना बसत आहे,” असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “आमची मागणी आहे की ही दरवाढ होतेय त्यावर सरकारने नियंत्रण आणावं आणि पेट्रोल- डिझेलची दरवाढ रोखावी. सरकार या पैशांमधून हजारो कोटींची कमाई करत आहे,” अशी टीका राहुल यांनी यावेळी केली.

नक्की वाचा >> पेट्रोल भरण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिक गुजरातमध्ये; दरांमधील फरक पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आंदोलनाच्यावेळी गॅस सिलेंडर आणि एका मोटरसायकलला हार घालून निषेध नोंदवण्यात आला. राहुल गांधी यांनी सर्वात आधी आंदोलनाच्या ठिकाणी बाईकला हार घातला. त्यापाठोपाठ इतर खासरदांनाही या बाईकला हार घालून प्रतिकात्मक आंदोलन केलं. इंधनदरवाढीमुळे मोटरसायक तसेच गॅस सिलेंडरचा मृत्यू झालाय अशा अर्थाने काँग्रेस खादरांनी या वस्तूंना श्रद्धांजली वाहिल्याचं सांगितलं जातंय.