वेगवेगळ्या निर्णयावरून मोदी सरकारवर सातत्यानं निशाणा साधणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली आहे. राहुल गांधी यांनी मनरेगा संदर्भात एक ट्विट केलं असून, मनरेगा मजुरांना पैसे काढण्यासाठी होत असलेल्या त्रासावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनरेगावर काम करणाऱ्या मजुरांना मजुरीचे पैसे काढण्यासाठी होत समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं वृत्त जनसत्तानं दिलं आहे. या वृत्ताचा हवाला देत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर धोरणांवरून टीका केली आहे.

आधी तुघलकी लॉकडाउन लागू केला, कोट्यवधी मजुरांना रस्त्यावर आणलं. नंतर त्यांचा एकमेव आधार असलेल्या मनरेगाची कमाई बँकांमधून काढणंही अवघड करून ठेवलं. मोदी सरकार फक्त बोलण्यापुरतच असून, गरीबांचे अधिकार पायदळी तुडवत आहे,” असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.

आणखी वाचा- बँक संकटात आणि जीडीपीही, विकास की विनाश?; राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

मनरेगाचा मुद्दा काय?

जनसत्तानं एका पाहणी अहवालातील आकडेवारीचा हवाला देत वृत्त प्रसिद्ध केलं होतं. पाहणीनुसार एका मजुराला मनरेगावरील कामापोटीचा मोबदला बँकेतून काढण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं म्हटलेलं आहे. एका मजुराला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्यासाठी ६ रुपयांपर्यंत खर्च येतो. त्याचबरोबर बँकेत जाण्यासाठी ३१ रुपये आणि एटीएमपर्यंत जाण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी ६७ रुपये खर्च करावा लागत असल्याचं पाहणीत म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi narendra modi lockdown mnrega bmh
First published on: 20-11-2020 at 11:45 IST