Rahul Gandhi Criticize Arvind Kejriwal over Yamuna pollution row : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतदान जवळ येत असतानाच काँग्रेस आणि आप नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. यादरम्यान काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी गुरूवारी आम आदमी पक्षाचे प्रमुख् अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. गांधी यांनी यमुना नदीच्या प्रदुषणाच्या मुद्द्यावर केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी केजरीवाल यांनी तुम्ही यमुना नदीत कधी डुबकी घेणार असा प्रश्न देखील विचारला.

लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत अरविंद केजरीवाल यांना चॅलेंज दिलं आहे. “केजरीवालजी आता २०२५ देखील आलं, तुम्ही यमुनेत कधी डुबकी घेणार? दिल्ली वाट पाहत आहे.” राहुल गांधी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ते स्थानिक लोकांशी यमुना नदीच्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर संवाद साधताना दिसत आहेत.

दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी केजरीवाल यांनी पाच वर्षांपूर्वी यमुनेचे पाणी पिण्यायोग्य बनवण्याच्या आश्वासनाच्या मुद्द्यावर टीका केली. त्यांनी केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेवर देखील टीका केली.

केजरीवाल यांनी गुरुवारी दावा केला की गेल्या काही दिवसांपासून हरियाणामधून अत्यंत धोकादायक अमोनिया पातळी असलेले पाणी यमुनेमध्ये सोडले जात आहे. केजरीवाल यांनी आरोप केला, “जेव्हा मुख्यमंत्री आतिशी यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून हे विषारी पाणी सोडणे थांबवण्याची विनंती केली, तेव्हा त्यांनी काहीही केले नाही.”

राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत जनतेला खोटी आश्वासने दिल्याचा आरोप केला. “त्यांनी खोटी आश्वासने दिली. पाच वर्षांपूर्वी केजरीवाल म्हणाले की मी यमुनेत स्नान करेन आणि नदीचे पाणी पिईल. मी त्यांना आव्हान देतो की, यमुनेचे पाणी सोडा, इथे (बदली) लोकांना मिळतं ते पाणी पिऊन दाखवा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ज्या व्यक्तीने मी भ्रष्टाचार संपवेन, यमुना नदीत आंघोळ करेल, यमुना नदीते पाणी पिईल, म्हटले होते, त्याच व्यक्तीने सर्वात मोठा मद्य घोटाळा केला आहे”, असेही राहुल गांधी म्हणाले.