पीटीआय, ऐझवाल

 या वर्षीच्या मे महिन्यापासून वांशिक संघर्षांने होरपळत असलेल्या मणिपूरपेक्षा इस्रायलमध्ये काय घडते आहे याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिक चिंता आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 लगतचे मणिपूर हे आता एकीकृत एक राज्य राहिलेले नसून, ते वांशिक आधारावर दोन राज्यांमध्ये विभाजित झाले आहे, असे येथील राजभवनाजवळ सभेला संबोधित करताना राहुल म्हणाले. यावेळी त्यांनी १९८६ साली शांतता कराराची आठवण करून दिली.  ‘मला याचे आश्चर्य वाटते, की आपले पंतप्रधान आणि भारत सरकार इस्रायलमध्ये काय चालले आहे यात रस घेत आहेत, पण जेथे लोकांची हत्या होत आहे, महिलांचा विनयभंग होत आहे आणि मुलांना ठार मारले जात आहे त्या मणिपूरमध्ये काय घडते आहे यात त्यांना काहीही रस नाही’, असे राहुल म्हणाले.या सभेपूर्वी राहुल यांनी ऐझवालच्या रस्त्यांवर दोन किलोमीटर अंतराची पदयात्रा काढली. यावेळी राहुल यांनी लोकांशी संवाद साधला.राहुल गांधी यांनी ऐझवालमध्ये चनमारी ते राजभवन पदयात्रा काढली.