भाजप भ्रष्टाचारात वस्ताद असून, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या कारभाराकडे पाहिले की हे लक्षात येते. त्यामुळे जनतेने या भ्रष्टाचारी पक्षास निवडून न देता राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसलाच सत्तेवर आणावे, असे आवाहन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. राजस्थानमधील बंसवारा येथील सभेत राहुल बोलत होते. ‘भाजपने आमच्या पेक्षा अधिक कामे केली आहेत, हे दाखवून द्यावे. त्यांनी केवळ भ्रष्टाचारच केला आहे. मध्य प्रदेश व छत्तीसगढ या राज्यांमध्ये सत्ताधारी भाजपने मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. ते भ्रष्टाचारात वस्तादच नाही तर तो करण्यात वेगवानही आहेत,’ असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले.