बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली. काँग्रेसला केवळ १९ जागाच मिळाल्या. तर महाआघाडीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलानं दमदार प्रदर्शन सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. बिहार निवडणुकीतील निकालानंतर काँग्रेस नेतृत्वाला आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झालेली असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी श्रमपरिहार करण्यासाठी दोन दिवसांच्या सुटीवर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मित्रांसोबत दोन दिवसांच्या खासगी पर्यटन दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी जैसलमेरमध्ये मुक्कामी असणार आहेत. बुधवारी (११ नोव्हेंबर) ते खासगी विमानानं जैसलमेरमध्ये दाखल होणार आहेत. त्यांच्या या सुटीचा कार्यक्रमही निश्चित झाला आहे.

राहुल गांधी यांच्या सुटीच्या कार्यक्रमाविषयी गुप्तता पाळण्यात आली आहे. जैमलमेरमध्ये एक दिवस राहुल गांधी टेंटमध्येही राहणार आहेत. राहुल गांधी यांच्या या सुटीच्या दौऱ्याची तयारीही सुरू झाली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफची तुकडीही जैसलमेर येथे पोहोचली आहे. राहुल गांधी ज्या हॉटेलमध्ये राहणार आहेत. तिथली सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे विमानतळावर त्यांचं स्वागत न करण्याच्या सूचना स्थानिक काँग्रेस नेत्यानं देण्यात आल्या आहेत.

राहुल गांधी दिल्लीतून विमानाने सकाळी जैसलमेर विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर ते पंचतारांकित सूर्यगढ फोर्ट हॉटेलमध्ये जाणार आहेत. याच सूर्यगढ हॉटेलमध्ये राजस्थानमधील काँग्रेसचे आमदार १५ दिवसांसाठी मुक्कामी होते. या सुटीत राहुल गांधी वाळवंटातील टेंटमध्ये एक रात्र राहणार असल्याचंही वृत्त आहे. राहुल गांधी यांच्यासोबत दहा व्हीआयपी लोकांच्या राहण्याची तयारी करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. राहुल गांधी एक दिवस हॉटेलमध्ये राहणार आहेत. तर दुसरा दिवस टेंटमध्ये घालवणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi two day personal trip jaisalmer bihar election result congress bmh
First published on: 11-11-2020 at 09:33 IST