बिहारमधील रेल्वे परीक्षांच्या मुद्द्यांवरून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. परीक्षांच्या निकालांवर आक्षेप घेणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांनी संतापाच्या भरात चक्क एक रिकामी रेल्वेच पेटवून दिल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी सांगितले की, यापुढे रेल्वे परीक्षा पद्धतशीर आणि अधिक चांगल्या रितीने नियोजन करून आयोजित केल्या जातील. ते इंडिया टुडेच्या बजेट गोलमेज 2022 मध्ये “द डबल-इंजिन ग्रोथ मॉडेल”मध्ये बोलत होते. रेल्वे परीक्षा आणि रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) भरती प्रक्रियेवर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावर आपले मत व्यक्त करताना अश्विनी वैष्णव म्हणाले, “की रेल्वे नोकऱ्या मर्यादित आहेत आणि अर्जदारांची संख्या मोठी आहे. दरम्यान, परीक्षेची प्रक्रिया देखील विकसित होत आहे. यापुढे रेल्वे परीक्षा पद्धतशीर आणि कितीतरी अधिक चांगल्या पद्धतीने आयोजित केली जाईल,” असे रेल्वे मंत्री म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षांचे निकाल लावताना बोर्डाने घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचा विरोध करण्यासाठी हजारो परीक्षार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले. दरम्यान, या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि रस्त्यावर उतरून परीक्षार्थींनी निषेध आंदोलन करतानाच गयामध्ये एका रिकाम्या रेल्वेवर दगडफेक करत आंदोलकांनी ही ट्रेनच पेटवून दिली होती. दरम्यान
