हरियाणातील जाट आंदोलनाला हिंसक वळण; लष्कराचा फ्लॅग मार्च

आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहतकमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे

Jat reservation crisis , BJP, Haryana, Loksatta, Loksatta news, marathi, Marathi news
हरियाणातील सहा जिल्ह्यात लष्काराला पाचारण करण्यात आले असून, त्यांनी शहरातून संचलन केले

आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गात समावेश व्हावा यासाठी गेल्या आठवडाभरापासून हरयाणात सुरू असलेल्या जाट आंदोलनाने शनिवारी अधिक उग्र रूप धारण केले. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहतकमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे तर ६१ जण जखमी झाले आहेत. तब्बल २३ जणांना पोलिसांच्या गोळ्या लागल्या आहेत. तरीही आंदोलकांनी आंदोलनाची धार कमी झालेली नाही. आंदोलकांनी आज जिल्ह्यातील बुधा खेरा रेल्वे स्थानक आंदोलनकर्त्यांनी जाळून टाकले . हरियाणातील सहा जिल्ह्यात लष्काराला पाचारण करण्यात आले असून, त्यांनी शहरातून संचलन केले. रोहतक, जिंद, झझ्झर, भिवानी, हिस्सार, कैथल, पानिपत, सोनिपत आणि कर्नाल या नऊ जिल्ह्यांत लष्कराला पाचारण करण्यात आले असून दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय केंद्रीय निमलष्करी दलांच्या वीस कंपन्यांची (सुमारे दोन हजार जवान) मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. पोलिसांच्या गोळीबारात एक जण ठार व २५ जण जखमी झाले. दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रोहतक आणि भिवानीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती हरियाणाच्या पोलीस महासंचलकांनी दिली. दरम्यान, या आंदोलनामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून त्यामुळे रेल्वेला २०० कोटींची फटका बसला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Railway station set on fire in jind bjp leaders in huddle to solve jat reservation crisis

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या