शिमला: हिमाचल प्रदेशात २० जून ते ७ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसाने ढगफुटी, अचानक पूर आणि भूस्खलनाच्या विविध घटनांमुळे ४,०७९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.
राज्यात पावसाशी संबंधित घटना आणि रस्ते अपघातांमध्ये ३६६ लोकांचा मृत्यू झाला. पंजाबमध्ये पुरामुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार ९ सप्टेंबर रोजी राज्याचा दौरा करणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी रविवारी दिली. पंजाबमधील पूर परिस्थितीमुळे बंद करण्यात आलेली शाळा, महाविद्यालये आज सोमवार (८ सप्टेंबर) पासून सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री हरजोत बैस यांनी रविवारी दिली.