सोनिया गांधींनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाची ऑफर दिली असल्याचा दावा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी फेटाळला आहे. काँग्रेसच्या श्रेष्ठींनी आपल्यावर जबाबदारी टाकलेली असून, आपण त्याच्याशी तडजोड करणार नाही असंही ते म्हणाले आहेत. “मला प्रसारमाध्यमांकडूनच ही माहिती मिळाली आहे. मला याबद्दल काहीच माहिती नाही. माझ्यावर दिलेल्या जबाबदाऱ्या मी पार पाडत आहे,” असं अशोक गहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“काँग्रेस वरिष्ठांनी माझ्यावर काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. गुजरातमधील निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे. राजस्थानमधील माझ्या कर्तव्यांशी मी एकनिष्ठ असून, त्यात कोणतीही तडजोड करत नाही आहे. इतर सर्व गोष्टी मला प्रसारमाध्यमांकडूनच कळत आहेत,” असं अशोक गहलोत म्हणाले आहेत.

“माझ्याशी बोलू नका,” लोकसभेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणींमध्ये जोरदार खडाजंगी, सुप्रिया सुळेंना करावी लागली मध्यस्थी

याआधी सोनिया गांधींनी अशोक गहलोत यांची भेट घेत पक्षाचं हंगामी अध्यक्षपद घेण्यास सांगितल्याचं वृत्त होतं. अशोक गहलोत यांनी गुजरातला जाण्याआधी दिल्लीत १० जनपथवर जाऊन सोनिया गांधींची भेट घेतली होती. अध्यक्षपदासाठी अशोक गहलोत यांच्या नावाची चर्चा असली तरी, अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

अशोक गहलोत अनुत्सुक?

अध्यक्षपदासाठी अशोक गहलोत यांच्या नावाला प्राधान्य असल्याची सूत्रांची माहिती आहे. पण अशोक गहलोत ही जबाबदारी स्वीकारण्यास अनुत्सुक आहेत. गांधी कुटुंबातील व्यक्ती नसताना पक्षाचं अध्यक्षपद मिळालं तरी, हातात जास्त अधिकार नसतील याची कल्पना अशोक गहलोत यांना आहे.

Maharashtra News Live : विधिमंडळ कामकाजाला घोषणाबाजीने सुरुवात; राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर!

यासोबतच त्यांच्याकडे असणारं मुख्यमंत्रीपद सोडण्याची त्यांची इच्छा नाही. विधानसभा निवडणुकीत पक्षाचं नेतृत्व करण्यावर ते ठाम आहेत. इतकंच नाही, तर सचिन पायलट यांच्याकडे जबाबदारी सोपवण्याचीही त्यांची तयारी नाही.

सोमवारी बोलताना अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्या नावाला सर्वांची सहमती असल्याचं सांगितलं. २१ ऑगस्टला काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. २२ सप्टेंबरपर्यंत नवे अध्यक्ष निवडण्यावर पक्ष ठाम आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan cm ashok gehlot on reports of sonia gandhi offered congress interim president post sgy
First published on: 24-08-2022 at 13:56 IST