नवी दिल्ली : राजीव कुमार यांची गुरुवारी देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.  सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र हे १४ मे रोजी निवृत्त झाल्यानंतर, १५ मे रोजी राजीव कुमार हे पदभार स्वीकारतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 सुशील चंद्र हे निवृत्त झाल्यानंतर निवडणूक आयोगात एक जागा रिक्त होईल. १९६० मध्ये जन्मलेले कुमार हे फेब्रुवारी २०२५च्या मध्यात निवृत्त होतील. राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांशिवाय, २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि अनेक विधानसभांच्या निवडणुका कुमार यांच्या देखरेखीखाली होणार आहेत. निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली, त्यावेळी राजीव कुमार हे सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे (पीईएसबी) अध्यक्ष होते. तत्कालीन निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या राजीनाम्यामुळे आयोगातील एक जागा रिक्त झाल्यानंतर १ सप्टेंबर २०२० रोजी त्यांनी निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. १९८४ च्या तुकडीचे बिहार- झारखंड कॅडरमधील आयएएस अधिकारी असलेले कुमार हे फेब्रुवारी २०२० मध्ये सेवेतून निवृत्त झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajiv kumar new chief election commissioner rajiv kumar take over post ysh
First published on: 13-05-2022 at 00:02 IST