रेझांग ला येथील युद्ध स्मारकाचे नूतनीकरण

१८ हजार फूट उंचीवर लढलेल्या रेझांग लाच्या ऐतिहासिक युद्धाची आजही कल्पना करणे कठीण आहे.

नूतनीकरण केलेल्या युद्ध स्मारकाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी पूर्व लडाखच्या रेझांग ला येथे नूतनीकरण केलेल्या युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले. याच ठिकाणी १९६२ मध्ये भारतीय जवानांनी चिनी सैन्याशी शौर्याने मुकाबला केला होता.  

हे युद्ध स्मारक १३ कुमाऊँ  रेजिमेंटच्या शूर भारतीय सैनिकांना समर्पित आहे, ज्यांनी रेझांग लाच्या युद्धात चीनचा पराभव करताना आपल्या प्राणांची आहुती दिली.

  हे स्मारक म्हणजे भारतीय सैन्याने दाखविलेल्या दृढनिश्चयाचे आणि अतीव धैर्याचे उदाहरण आहे, अशा शब्दांत सिंह यांनी स्मारकाचे वर्णन केले. ‘केवळ इतिहासाच्या पानांमध्ये अमर नाही, तर आपल्या हृदयातही कयम अमर राहील,’ असेही संरक्षणमंत्री म्हणाले.

‘१८ हजार फूट उंचीवर लढलेल्या रेझांग लाच्या ऐतिहासिक युद्धाची आजही कल्पना करणे कठीण आहे. जगातील दहा सर्वात मोठय़ा आणि अतिशय आव्हानात्मक लष्करी संघर्षांपैकी एक रेझांग लाची लढाई मानली जाते. मेजर शैतान सिंग

आणि त्यांचे सहकारी सैनिक ‘शेवटची गोळी आणि शेवटच्या श्वासापर्यंत’ लढले आणि शौर्य आणि बलिदानाचा नवा अध्याय लिहिला’, असे गौरवोद्गार सिंह यांनी काढले.

१९६२ च्या युद्धात लडाखच्या सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांना आपण श्रद्धांजली अर्पण करत असल्याचे ट्वीट संरक्षणमंत्र्यांनी केले.

रेझांग लाच्या लढाईच्या ५९ व्या वर्धापनदिनानिमित्त युद्ध स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्व लडाख सेक्टरमध्ये असलेले रेझांग ला युद्ध स्मारक पूर्वी छोटे होते. आता ते खूप मोठे करण्यात आले आहे. लडाखच्या पर्यटन नकाशावरही ते आणले जाईल.

आता सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकही या युद्ध स्मारकाला आणि सीमावर्ती भागाला भेट देऊ शकतील.

भारत आणि चीन यांच्यातील कडाक्याच्या सीमेवर बंदिस्त असताना हे नूतनीकरण केलेले युद्ध स्मारक उघडण्यात आले आहे.

दोन्ही बाजूला सैनिक तैनात

मागील वर्षी ५ मे रोजी पॅंगॉन्ग सरोवर भागात झालेल्या हिंसक चकमकीनंतर पूर्व लडाख सीमेवर भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान संघर्ष सुरू झाला आणि दोन्ही बाजूंनी तैनात वाढवण्यात आली. या संवेदनशील क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एसएसी) दोन्ही बाजूला सध्या मोठय़ा प्रमाणात सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rajnath singh inaugurates revamped memorial at rezang la zws

ताज्या बातम्या