scorecardresearch

Premium

रामदेवबाबांना उपरती, गळा कापण्याच्या वक्तव्यावरून माघार

केवळ असदुद्दिन ओवेसी यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तसे म्हणालो होतो

ramdev baba, रामदेव बाबा
इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्माविरूद्ध अवमानकारक वक्तव्य करणे हे ओवेसी यांनी केलेल्या वक्तव्याइतकेच मूर्खपणाचे ठरते, असेही रामदेवबाबा यांनी सांगितले.

‘भारत माता की जय’ न म्हणणाऱ्यांचा गळाच कापला असता, असे प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या योगगुरू रामदेवबाबा यांना उपरती झाली असून, त्यांनी आपल्या विधानावरून मंगळवारी माघार घेतली. आपण केवळ एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवेसी यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तसे म्हणालो होतो. पण आपण तसे काहीही करणार नसल्याचे रामदेव बाबा यांनी मंगळवारी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले.
इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्माविरूद्ध अवमानकारक वक्तव्य करणे हे ओवेसी यांनी केलेल्या वक्तव्याइतकेच मूर्खपणाचे ठरते, असेही रामदेवबाबा यांनी सांगितले. आपल्या गळ्यावर कोणी चाकू ठेवला तरी आपण ‘भारत माता की जय’ म्हणणार नाही, असे वक्तव्य असदुद्दिन ओवेसी यांनी केले होते. ‘भारत माता की जय’ म्हणण्याची जबरदस्ती का, असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला. त्यानंतर रामदेवबाबा यांनी जर देशामध्ये कायदा नसता, तर ‘भारत माता की जय’ न म्हणणाऱ्यां लाखो लोकांचा गळाच आपण कापला असता, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. जर कोणत्या धर्मामध्ये मातृभूमीचा आदर करा, असे शिकवत नसतील, तर तो धर्मच देशहिताचा नाही, असेही रामदेवबाबांनी म्हटले होते.

Radhakrishna Vikhe Patil and Chhagan Bhujbal
भुजबळांना सल्ला देण्याची गरज नाही, राधाकृष्ण विखे पाटील असे का म्हणाले…?
Food Safety and Standards Authority of India
“समोसे, मिठाई पार्सलसाठी वर्तमानपत्र वापरू नका”, सणांच्या पार्श्वभूमीवर FSSAI चा दुकानदारांना इशारा!
Notice of Divorce to Wife
अकोला : ‘तू मला आवडत नाहीस, तुझ्यासोबत संसार करायचा नाही’, पतीची पत्नीला घटस्फोटाची नोटीस; चौघांवर गुन्हा दाखल
exercise at the age of 60
आरोग्य वार्ता : वयाच्या ६० व्या वर्षी किती व्यायाम करावा?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ramdev baba backtracked from his controversial remark

First published on: 26-04-2016 at 16:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×