काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव पीपी माधवन यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या आरोपानंतर दिल्ली पोलिसांनी माधवन यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >> अयोध्येत सापडले बेवारस अवस्थेत १८ हातबॉम्ब; परिसरात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार महिलेने ७१ वर्षीय पीपी माधवन यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार माधवन यांनी महिलेविषयी प्रेम व्यक्त करत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांनी संमतीशिवाय या महिलेशी लैंगिक संबंध ठेवले. तक्रारदार महिलेचे पती दिल्लीमधील काँग्रेसच्या कार्यालयात पोस्टर्स लावण्यासोबतच इतर काम करायचे. मात्र त्यांचे २०२० साली निधन झाले होते.

हेही वाचा >> मुकेश अंबानींच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

“माझ्या पतींचा फ्रेब्रुवारी २०२० मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर मी नोकरीच्या शोधात असताना माझी माधवन यांच्याशी ओळख झाली. त्यांनी अगोदर मला मुलाखतीसाठी बोलावले. ते माझ्याशी व्हिडीओ कॉल तसेच व्हॉट्सअॅपवर बोलायचे,” असा दावा तक्रारदार महिलेने केला आहे.

हेही वाचा >> तलाक-ए-हसनला आव्हान देणारी याचिका दाखल; दिल्ली हायकोर्टाची पोलीस व पतीला नोटीस

तसेच, “माधवन मला उत्तम नगर मेट्रो परिसरातील एका निर्जन स्थळी घेऊन गेले. तेथे एका कारमध्ये त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. फेब्रुवारी २०२२ साली ते मला सुंदर नगर येथील एका फ्लॅटमध्ये घेऊन गेले. येथेही त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली होती,” असाही दावा तक्रारदार महिलेने केले आहे.

हेही वाचा >> बंडखोर आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याने ११ जुलैआधी बहुमत चाचणी होणार की नाही?; सर्वोच्च न्यायालय म्हणालं…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पीपी माधवन यांच्या स्वीय सहाय्यकाने बलात्काराचे हे आरोप फेटाळून लावले आहे. तसेच हे एक कटकारस्थान असून आरोप निराधार आहेत, असेदेखील पीपी माधवन यांच्या स्वीय सहाय्यकाने सांगितले.