एपी, जिनिव्हा : रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून ४० लाखांहून अधिक लोकांनी युक्रेनबाहेर पलायन केले असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक यंत्रणेने बुधवारी सांगितले. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर युरोपमधील निर्वासितांबाबतचे हे सगळय़ात मोठे संकट असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.

हा नवा आकडा संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक उच्चायुक्तांच्या (यूएनएचसीआर) संकेतस्थळावर टाकण्यात आला आहे. २३ लाखांहून अधिक लोक पोलंडमध्ये आले आहेत, मात्र अनेक लोक तेथून इतर देशांमध्ये गेले आहेत, किंवा युक्रेनमध्ये परत गेले आहेत. अनेक लोकांचे युद्धासंबंधीच्या घडामोडींची प्रतीक्षा करत असल्यामुळे स्थलांतरितांची संख्या रोडावली असल्याचे मदत कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. युक्रेनमध्ये अंदाजे ६५ लाख लोक त्यांच्या घरांतून विस्थापित झाले आहेत.

Israel, Iran , missile attack
विश्लेषण : इराण-इस्रायल यांच्यात युद्ध भडकणार? परिस्थिती चिघळण्यास अमेरिकेची चूक कशी कारण ठरली?
gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?

२४ फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासून ६ लाख ८ हजारांहून अधिक लोक रुमानियात प्रवेशले आहेत, ३ लाख ८७ हजारांहून अधिक लोक मोल्दोवाला गेले आहेत, तर सुमारे ३ लाख ६४ हजार लोक हंगेरीत शिरले आहेत, असे या यंत्रणेने विविध सरकारांनी पुरवलेल्या आकडय़ांच्या आधारे सांगितले आहे. ४० लाख लोक युक्रेनमधून पळून जाऊ शकतात, असा अंदाज यूएनएचसीआरने युद्ध सुरू होताच व्यक्त केला होता. ‘रशियन आक्रमणाच्या पाच आठवडय़ांनंतर युक्रेनमधील निर्वासितांची संख्या आता ४० लाख आहे’, असे संयुक्त राष्ट्रांकडून सांगण्यात आले.