चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाईत महागई हळूहळू कमी होईल, असा विश्वास भारतीय रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केला आहे. तसेच महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व बॅंकेतर्फे आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. कौटिल्य आर्थिक परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

”सद्यस्थितीत देशात पुरवठा योग्य पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या शेवटच्या सहा महिन्यात महागाई नियंत्रणात येण्यााची शक्यता आहे. देशात आर्थिक स्थैर्य राहण्यासाठी किंमती नियंत्रणात असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी रिझर्व बॅंकेतर्फे आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत”, असेही शशीकांत दास म्हणाले.

ते पुढे बोलताना म्हणाले, ”काही घटक हे आमच्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत. ते थोड्या फार प्रमाणात महागाईवर परिणाम करू शकतात. त्यामुळे वेळेनुसार चलनविषयक धोरणांमध्ये बदल करावे लागतील.” तसेच चलनविषयक धोरण ( Monetary Policy Committee ) समितीने एप्रिल आणि जूनमध्ये झालेल्या बैठकीत महागाईचा दर ६.७ टक्के राहिल, असा अंदाज वर्तवला होता, असेही म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – महागाईवरून राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, म्हणाले, “भाजपा सरकारच्या काळात…..”