Repo Rate Increased: गेल्या ८ महिन्यांत पाचव्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. शुक्रवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये ३५ पॉइंटची वाढ करण्यात आल्याची घोषणा केली. त्यामुळे आता एकूण रेपो रेट ५.९ टक्क्यांवरून थेट ६.२५ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या आठ महिन्यांत तब्बल २२५ टक्क्यांनी रेपो रेटमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता त्याचा अप्रत्यक्ष परिणाम गृहकर्ज आणि बँकांकडून इतर गोष्टींसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जांवरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरबीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या निर्णयाला रिझर्व्ह बँकेच्या संबंधित बोर्डाच्या सहापैकी पाच सदस्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

करोना काळात आरबीआयनं रेपो रेटमध्ये वाढ न करता जे जैसे थेच ठेवले होते. मात्र, या वर्षी मे महिन्यात आरबीआयनं ४० पॉइंटची वाढ केली. त्यानंतर सलग तीन महिन्यात वेळा प्रत्येकी ५० पॉइंटची वाढ करण्यात आली.

विश्लेषण: रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट वाढवला, तुमच्या EMI वर त्याचा किती परिणाम होणार? जाणून घ्या

रेपो रेटचा EMI शी नेमका काय संबंध?

काही तज्ज्ञांच्या मते २०२२ हे वर्ष संपता संपता रेपो रेट ५.७५ टक्क्यांच्या घरात जाईल. तर काही तज्ज्ञांनी हा दर ६ टक्क्यांपर्यंतही वाढवला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे. आता याचा तुमच्या ईएमआयशी काय संबंध आहे ते बघुया.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्याजदरवाढीचा बोजा स्वत: सहन न करता तो भार ग्राहकांवर टाकणं हे बँकांसाठी नित्याचं आहे. बँकांच्या नफ्याचं प्रमाण किती आहे यावर व्याजदर वाढीचा बोजा आपण सोसायचा का? किती सोसायचा? हे कर्जदात्या बँका व वित्तसंस्था ठरवतात. थकित कर्जांचं प्रमाण जास्त असलेल्या वित्तसंस्थांची बॅलन्स शीट सक्षम नसल्याने व्याजदरवाढीचा बोजा तुमच्यावर ढकलला जाऊन तुमचा ईएमआय वाढायची शक्यता जास्त आहे.