करोनाकाळानंतर प्रथमच दिवसभरात ९१ हजार ९०४ प्रवासी

करोनाकाळातील विमान प्रवासासंदर्भात लादण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले असल्याने गेले दीड वर्ष फारशी वर्दळ नसलेले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुन्हा गजबजू लागले आहे. १७ ऑक्टोबरला दिवसभरात ९१ हजार ९०४ एवढ्या विक्रमी संख्येने विमानतळावर प्रवाशांनी हजेरी लावली.

रविवारी १७ ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ वरून एकू ण ७५ हजार ९४४ प्रवाशांनी प्रवास केला, त्यापैकी ३७ हजार ३१५ प्रवासी विमानतळावर उतरले, तर ३८ हजार ६२९ प्रवाशांनी येथून देशांतर्गत आणि देशाबाहेर प्रवास के ला. तर टर्मिनल १ वरून ७ हजार ६९० प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास के ला, ८ हजार २७० प्रवासी विमानतळावर उतरले. टर्मिनल १ वरून ४१४ देशांतर्गत उड्डाणे करण्यात आली. तर टर्मिनल २ वरून झालेल्या ४९४ उड्डाणांपैकी ४१५ देशांतर्गत आणि ७९ आंतरराष्ट्रीय हवाईमार्गावरील उड्डाणे होती. देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांची सर्वाधिक पसंती इंडिगोच्या विमानसेवेला मिळाली, तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी एअर इंडियाच्या विमानसेवेचा लाभ १० हजार २२६ एवढ्या प्रवाशांनी घेतला. ही सर्वाधिक प्रवासीसंख्या असल्याचे सांगितले जाते. टर्मिनल १ आणि टर्मिनल २ या दोन्ही विमानतळावरून दिल्ली, बंगळूरु आणि गोवा या तिन्ही ठिकाणांहून सर्वाधिक प्रवाशांनी ये-जा के ली. दैनंदिन उड्डाणांची संख्या सतत वाढत असल्याने टर्मिनल २ अपुरे पडू लागले होते. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच टर्मिनल १ वरून हवाई उड्डाण सुरू झाल्याने व्यवस्थापनावरचा भार कमी झाला आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या करोना प्रतिबंधक लशींना मान्यतेबाबत भारताचा ज्या देशाशी परस्पर करार झाला आहे, तेथून येणाऱ्या संपूर्ण लसीकरण झालेल्या प्रवाशांना २५ ऑक्टोबरपासून चाचणीशिवाय विमानतळ सोडण्याची परवानगी देण्यात येईल व त्यांना गृह विलगीकरणात राहावे लागणार नाही, असे भारताने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी बुधवारी जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे. तथापि, करोना आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक असल्याचा अहवाल या प्रवाशांना सादर करावा लागणार आहे.