गाझियाबाद : कथितरीत्या धर्मातरणाचे रॅकेट चालवणाऱ्या एका तरुणाच्या मोबाइल फोनमध्ये ३० पाकिस्तानी लोकांचे संपर्क क्रमांक आढळून आल्याचे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी सांगितले.

 महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील रहिवासी असलेला शाहनवाझ खान ऊर्फ बड्डू हा किमान सहा ई-मेल पत्ते वापरत होता व त्यापैकी एकाच्या इनबॉक्समध्ये पाकिस्तानातून आलेले ई-मेल होते, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

lokmanas
लोकमानस: धार्मिकतेला धर्मांधतेकडे वळविण्याचा प्रयत्न
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
india chiana Meeting in Beijing on India China border dispute
भारत-चीन सीमावादावर बीजिंगमध्ये बैठक; परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती

आरोपीकडून पोलिसांनी दोन मोबाइल फोन आणि त्याच्या संगणकाचा सीपीयू पुढील तपासासाठी जप्त केला आहे.  खान हा ऑनलाइन गेमिंगसाठी दोन ई-मेलसह सहा ई-मेल पत्त्यांचा वापर करत होता, असे पोलीस उपायुक्त निपुण अग्रवाल यांनी सांगितले.

 ठाणे येथून ट्रांझिट रिमांडवर आणण्यात आलेल्या या आरोपीला गाझियाबादच्या न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर मंगळवारी न्यायालयाने त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

उत्तर प्रदेश पोलिसांचा सायबर गुन्हे विभाग शाहनवाझ खानच्या मोबाइल फोनमध्ये सापडलेल्या ३० पाकिस्तानी दूरध्वनी क्रमांकांचे अधिक तपशील मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे अग्रवाल म्हणाले. या क्रमांकांबाबत काही आक्षेपार्ह आढळल्यास पोलीस खान याच्याविरुद्ध कठोर असा राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू करतील, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या मुलाला एका ऑनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून प्रलोभन दाखवून त्याचे धर्मातर करण्यात आले, अशी तक्रार कवी नगर भागात राहणाऱ्या एका नागरिकाने ३० मे रोजी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. तिच्या आधारे पोलिसांनी खान याला अलिबाग येथून रविवारी अटक केली होती.