बुधवारी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाची परेड काही खास असणार आहे. इतिहासात प्रथमच या परेडमध्ये ७५ विमानांचा फ्लाय पास्ट होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की ७५ विमानांचे भव्य फ्लाय-पास्ट सांस्कृतिक प्रदर्शन होणार आहे. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ७५ मीटर लांबीच्या १० स्क्रोलचे (सांस्कृतिक नृत्य) प्रदर्शन यासारखे कार्यक्रम होणार आहेत.

एका निवेदनात, मंत्रालयाने म्हटले आहे की भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात आयोजित प्रजासत्ताक दिन परेड-२०२२ हा देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ म्हणून साजरा केला जात आहे. प्रथमच, भारतीय हवाई दलाची ७५ विमाने आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून सहभागी होतील.

Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?
UPSC 2023 Topper Aditya Srivastava
अडीच लाख महिना पगार सोडून UPSC ची तयारी केली आणि थेट देशात पहिला आला; आदित्य श्रीवास्तवचा अविश्वसनीय प्रवास!
balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक
eid al fitr 2024 chand raat ramadan eid 2024 know the date and timings of eid al fitr moon sighting
१० की ११ एप्रिल, भारतात कधी दिसणार ‘ईद’चा चंद्र? भारतासह परदेशात कशाप्रकारे ठरवली जाते ‘ईद’ साजरी करण्याची तारीख?

मंत्रालयाने सांगितले की, परेडमध्ये फ्लाय-पास्ट दरम्यान कॉकपिटमधील व्हिडिओ दाखवण्यासाठी भारतीय वायुसेनेने प्रथमच दूरदर्शनसोबत संपर्क केला आहे. राफेल, सुखोई, जग्वार, एमआय-१७, सारंग, अपाचे आणि डकोटा या जुन्या आणि सध्याच्या आधुनिक विमानांचा फ्लाय-पास्ट राहत, मेघना, एकलव्य, त्रिशूल, तिरंगा, विजय आणि अमृत यासह विविध संयोजनांमध्ये (फॉर्मेशन्स) सादर केला जाणार आहे.

मंत्रालयाने सांगितले की, प्रथमच परेड दरम्यान राजपथावर ७५ मीटर लांबीचे आणि १५ फूट उंचीचे १० स्क्रोल प्रदर्शित केले जातील. हे स्क्रोल संरक्षण आणि संस्कृती मंत्रालयांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कला कुंभ कार्यक्रमादरम्यान तयार केले होते, असे निवेदनात म्हटले आहे. देशभरातील ६०० हून अधिक नामवंत कलाकार आणि तरुण कलाकारांनी भुवनेश्वर आणि चंदीगड येथे दोन टप्प्यांत या स्क्रोलमध्ये सहभाग घेतला होता.

संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, प्रथमच परेडमधील सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान सादरीकरण करणाऱ्या कलाकारांची देशव्यापी स्पर्धेद्वारे निवड करण्यात आली आहे. वंदे भारतम ही स्पर्धा जिल्हा स्तरावर ३२३ गटांमध्ये सुमारे ३,८७९ नर्तकांच्या सहभागाने सुरू झाली ज्यामध्ये कलाकार नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्य आणि विभागीय स्तरावरील कार्यक्रमांमध्ये पोहोचले होते असे यामध्ये सांगितले आहे.

संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, परेड चांगल्या प्रकारे पाहण्यासाठी राजपथच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी पाच संख्येने १० मोठ्या एलईडी स्क्रीन बसवण्यात येतील. गेल्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे फुटेज, सशस्त्र दलांवरील लघुपट आणि प्रजासत्ताक दिनापूर्वीच्या परेड-२०२२ शी संबंधित विविध घटनांच्या कथांवर आधारित चित्रपट परेडपूर्वी दाखवले जातील, असे निवेदनात म्हटले आहे.