पीटीआय, श्रीनगर

जम्मू-काश्मीरला पूर्वीप्रमाणे विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या ठरावावरून विधानसभेत बुधवारी जोरदार खडाजंगी झाली. अतिशय गोंधळात पूर्वीप्रमाणे जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा ठराव चर्चेविना मंजूर करण्यात आला. मात्र, भाजप सदस्यांनी या वेळी गोंधळ घालून ठरावाच्या प्रती सभागृहात फाडून टाकल्या आणि अध्यक्षांविरोधात घोषणाबाजी केली.

जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी ठराव सभागृहात मांडला. पूर्वीच्या जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा एकतर्फी काढून टाकण्यावर ठरावामध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी सभागृहात गोंधळाचे वातावरण असताना आवाजी मतदानासाठी ते पटलावर ठेवले. निवडणूक जाहीरनाम्यातील एक आश्वासन पूर्ण केल्याबद्दल ‘नॅशनल कॉन्फरन्स’ने या वेळी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा >>>Supreme Court : “ही मनमानी…”, बुलडोझर कारवाईवरून योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं; २५ लाखांच्या भरपाईचे आदेश

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ‘विधानसभेने आपले काम केले आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली.

‘पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी’ने (पीडीपी) ठरावाला पाठिंबा दिला. मात्र, हा ठराव अधिक चांगल्या पद्धतीने लिहिता आला असता, अशी टिप्पणी पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘विधानसभा अध्यक्ष आज अध्यक्षांपेक्षा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते अधिक वाटले,’ अशी प्रतिक्रिया भाजप आमदार शामलाल शर्मा यांनी व्यक्त केली. ‘काश्मीरकेंद्री पक्षांची सद्दी आता संपली आहे, असे त्यांना आता सांगावेसे वाटते,’