restaurant denies entry to couple for indian attire Video : दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये कथितपणे भारतीय पोशाख घातल्यामुळे एका जोडप्याला प्रवेश नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, दिल्लीच्या पितमपुरा भागात असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर हे जोडपे घडलेल्या प्रसंगाबाबत माहिती देताना दिसत आहे.
इतरांना प्रवेश दिला जात असताना रेस्टॉरंटच्या मॅनेजरने त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा या जोडप्याचा आरोप आहे. हा व्हिडीओ रेकॉर्ड करत असलेला व्यक्ती, या व्हिडीओमध्ये म्हणताना ऐकू येत आहे की रेस्टॉरंटमध्ये भारतीय पद्धतीचा पोशाख असलेल्या लोकांना प्रवेश नाकारणाऱ्या रेस्टॉरंटना सुरू राहण्याचा अधिकार नाही. हे तात्काळ बंद केले पाहिजे.
दरम्यान ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर दिल्लीचे कॅबिनेट मंत्री कपिल मिश्रा यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली, तसेच त्यांनी या प्रकरणाची मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “दिल्लीत हे स्वीकारले जाऊ शकत नाही. पीतमपुरा येथे एका रेस्टॉरंटमध्ये भारतीय पोषाख घातलेल्यांना रोखल्याचा व्हिडीओ समोर आळा आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घटनेची दखल घेतली आहे. अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आणि तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत,” असे मिश्रा त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
This is unacceptable in Delhi
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) August 8, 2025
पीतमपुरा के एक रेस्टोरेंट में भारतीय परिधानों पर रोक का वीडियो सामने आया है
ये अस्वीकार्य है
CM @gupta_rekha जी ने घटना का गंभीरता से संज्ञान लिया है
अधिकारियों को इस घटना की जांच व तुरंत कार्यवाही के निर्देश दिए गए हैं https://t.co/ZUkTkAZmAT
त्यानंतर मिश्रा यांनी आणखी एक पोस्ट करत माहिती दिली की, की रेस्टॉरंट मालक यापुढे त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्याबाबत ग्राहकांच्या पोशाखावर कोणतीही बंदी घालणार नाही.
“पीतमपुराच्या या रेस्टॉरंटच्या संचालकांनी मान्य केले आहे की पोशाखावर आधारित कोणतेही बंधने यापुढे लावली जाणार नाहीत आणि भारतीय पोशाखात येणाऱ्या नागरिकांचे स्वागत केले जाईल. रक्षांबंधनच्या दिवशी भारतीय पोशाखात येणाऱ्या बहिणींना काही सूट देखील देतील,” असे मिश्रा म्हणाले आहेत.
Update : पीतमपुरा के इस रेस्टोरेंट के संचालकों ने स्वीकार कर लिया है कि परिधान आधारित कोई प्रतिबंध अब नहीं लगाएंगे व भारतीय परिधानों में आने वाले नागरिकों का स्वागत करेंगे
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) August 8, 2025
रक्षाबंधन पर भारतीय परिधानों में आने वाली बहनों को कुछ डिस्काउंट भी देंगे ?@gupta_rekha https://t.co/YFkmOaj8i7 pic.twitter.com/k0qRzyPCot
मात्र या प्रकारानंतर रेस्टॉरंटचे मालक नीरज अग्रवाल यांनी आरोप फेटाळले आहेत, आणि जोडप्याने टेबल बुक केला नव्हता त्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच पोशाखाबाबत रेस्टॉरंटचे कोणतेही धोरण नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान सोशल मीडियावर या प्रकारामुळे चर्चा सुरू झाली आहे, युजर्सच्या एका गटाकडून या रेस्टॉरंटवर कारवाईची माहणी केली जात आहे.