पंजाब नॅशनल बँकेतील आर्थिक घोटाळा, अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध, शेअर्सवर आकारण्यात येणाऱ्या LTCG टॅक्सवरुन असलेली अस्वस्थतता या सर्व प्रतिकुल परिस्थितीतून भारतीय शेअर बाजार आता बऱ्यापैकी सावरला आहे. मागच्या महिन्याभरापासून भारतीय शेअर्सच्या मुल्यामध्ये सातत्याने वाढ झाली आहे. पाचवर्षांचा विचार करता चीन आणि जपानच्या तुलनेत देशातंर्गत शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सच्या मुल्यामध्ये घसघशीत वाढ झाली आहे. रिको ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड या वाहन क्षेत्रातील कंपनीच्या प्रगतीपुस्तकावर नजर टाकली तर लक्षात येईल कि, पाचवर्षांच्या आत या कंपनीने गुंतवणूकदारांना दामदुप्पट फायदा मिळवून दिला आहे.

Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात

रिको ऑटो इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये १८०० टक्के वाढ झाली आहे. पाचवर्षांपूर्वी ४.३ रुपये मुल्य असलेल्या एका शेअरची किंमत आज ८१.८५ रुपये आहे. म्हणजे पाचवर्षांपूर्वी तुम्ही या कंपनीच्या शेअर्समध्ये १० हजार रुपये गुंतवणूक केली असेल तर आज या शेअर्सचे मुल्य १ लाख ९० हजार ३४९ रुपये आहे. कंपनीने १ रुपये फेसव्हॅल्यु असलेल्या शेअरवर ५ रुपये डिव्हिडंड वाटला आहे.