हमास या दहशतवादी गटानं शनिवारी, ७ ऑक्टोबरला इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. यानंतर गाझा पट्टीतील सीमावर्ती भागातून अनेक हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले. या दहशतवाद्यांनी अनेक इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवलं आहे. अशातच एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात बंदूकधारी हमासचे दहशतवादी लहान मुलांना सांभाळताना दिसत आहे. पण, हमासकडून ओलीस ठेवलेल्यांवर अत्याचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

हमासकडून व्हिडीओ टेलिग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इस्रायलच्या लष्करी विभागानं ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर पोस्ट केला आहे. हमासला व्हिडीओ शेअर करून सांगायचं आहे की, ते ओलीस ठेवलेल्यांना चांगली वागणूक देत आहेत.

व्हिडीओत काय?

बंदूकधारी असलेल्या एक व्यक्तीनं मुलाला आपल्या कडेवर उचललं आहे. तर, हमासच्या दहशतवाद्यांचा एक गट रडणाऱ्या बालकाला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिडीओच्या शेवटी एक दहशतवादी एका मुलाला कपात पाणी पिण्यास देतो. पाणी पिण्यापूर्वी दहशतवादी मुलास ‘बिस्मिल्लाह’ बोलायला लावतो. व्हिडीओच्या सुरूवातीला हाच मुलगा टेबलवर बसून रडताना दिसत आहे.

हेही वाचा : “इस्रायलनं गाझावर जमिनीवरील हल्ले केल्यास…”, व्लादिमीर पुतिन यांचा इशारा

हेही वाचा : “शत्रूशी लढण्यासाठी सर्व ताकद वापरू”, नेतान्याहूंचा हमासला थेट इशारा; म्हणाले, “ही फक्त…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गाझा पट्टीत ओलीस ठेवण्यात आलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचं इस्रायल आणि अमेरिकेनं सांगितलं आहे. यासाठी इस्रायलनं गाझा पट्टीत जमिनी हल्ला करण्याचा इशारा दिला आहे.