ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे ज्या प्रमाणे देशाच्या राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये कायमच चर्चेत असतात, त्याचप्रमाणे ते सोशल मीडियावरही तितकेच ‘व्हायरल’ असतात. त्यांनी वेळोवेळी औपचारिक किंवा अनौपचारिक भेटीगाठींमध्ये केलेली विधानं, प्रतिक्रिया, भूमिका या चर्चेचा विषय ठरतात. सध्या त्यांनी केलेलं असंच एक विधान चर्चेत आलं असून त्यावरून सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. २०२३च्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलं.

आपल्या भाषणात ऋषी सुनक यांनी यावेळी केलेल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका मांडली. यात ब्रिटनमध्ये धुम्रपान करण्याचं वय वाढवण्याचा विचार सरकार करत असल्याचं ते म्हणाले. मात्र, त्यावेळी तृतीयपंथी समुदायाविषयी बोलताना त्यांनी केलेलं विधान वादात सापडण्याची शक्यता आहे. “पुरुष हा पुरुष असतो आणि स्त्री ही स्त्री असते. एवढी साधी गोष्ट आहे ही”, असं ते म्हणाले आहेत.

ऋषी सुनक अन् अक्षता मूर्ती हे जी २० मध्ये सहभागी झालेले श्रीमंत जोडपे, जाणून घ्या त्यांची एकूण संपत्ती किती?

“तुम्हाला हवं ते तुम्ही ठरवू शकत नाही”

ऋषी सुनक म्हणाले, “जेव्हा रुग्णालयं पुरुष किंवा स्त्रियांविषयी बोलतात, तेव्हा त्या त्या रुग्णांना ते समजायला हवं. लोकांना हवी ती लैंगिक ओळख ते धारण करू शकतात असं मानण्याची आपल्यावर कुणी सक्ती करू शकत नाही. एक पुरुष हा पुरुष असतो आणि एक स्त्री ही स्त्री असते. ही एवढी साधी गोष्ट आहे”, असं सुनक म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दरवर्षी धुम्रपानाचं वय एक वर्षानं वाढणार”

दरम्यान, यावेळी सुनक यांनी ब्रिटनमध्ये धुम्रपान करण्याचं वय वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचं नमूद केलं. “माझा असा प्रस्ताव आहे की इथून पुढे आपण धुम्रपान करण्याचं वय दरवर्षी एकेका वर्षानं वाढवत न्यायचं. जेणेकरून आज १४ वर्षं वय असणारा मुलगा भविष्यात कधीच सिगारेट विकू शकणार नाही. ते आणि त्यांची पिढी धुम्रपानमुक्त आयुष्य जगू शकतील”, असंही सुनक यांनी नमूद केलं.