देशात गेल्या काही दिवसांपासून करोना व्हायरसचे रूग्ण हे जवळपास संपल्यात जमा आहेत. करोनाचे रूग्ण आढळण्याचं प्रमाण खूपच कमी झालं आहे. अशात सर्दी आणि खोकल्याचे रूग्ण गेल्या काही दिवसांमध्ये चांगलेच वाढले आहेत. खोकला एकदा झाला की तीन तीन आठवडे कमी होत नाही असं चित्र आहे. सर्दी-खोकला आणि ताप येणारे रूग्णही वाढले आहेत. अशात इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)ने असं म्हटलं आहे की हे एका व्हायरसमुळेच होतं आहे.

काय म्हटलं आहे ICMR च्या तज्ज्ञांनी?

आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार मागच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये इन्फ्लुएंझाचे रूग्ण वाढले आहेत. इन्फ्लुएंझा व्हायरसचा A सबटाइप म्हणजेच H3N2 या व्हायरसमुळे लोकांना सर्दी-खोकला आणि ताप या आजारांना सामोरं जावं लागतं आहे. H3N2 या व्हायरसमुळे लोकांचं रूग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण वाढल्याचंही ICMR ने म्हटलं आहे. तसंच इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMA ने असं म्हटलं आहे की सध्या वातावरणातल्या बदलांमुळेही तापाची साथ येते आहे. हा ताप पाच दिवस ते सात दिवस इतका कालावधी राहतो आहे. IMA ने सर्दी-खोकला आणि ताप आल्यावर अँटी बायोटेक घ्या आणि स्वतःचा बचाव करा असा सल्ला दिला आहे.
आयएमएच्या म्हणण्यानुसार काही काही रूग्ण असेही आहेत ज्यांचा ताप तीन दिवसांमध्ये जातो आहे. मात्र सर्दी आणि खोकला तीन आठवड्यांमध्येही जात नाही. प्रदूषणामुळेही १५ पेक्षा कमी वय असलेल्या मुलांमध्ये आणि ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वयस्कर लोकांमध्ये सर्दी-खोकला आणि ताप येण्याचं प्रमाण वाढलं आहे.

Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

इनफ्लुएंझा म्हणजे काय?

जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने दिलेल्या माहितीनुसार
इनफ्लुएंझा व्हायरस चार प्रकारचा असतो A, B, C, D असे चार प्रकार त्यात असतात. त्यातल्या A-B टाइपचे व्हायरस हे वातावरणातल्या बदलांमुळे पसरतात आणि आजारांचा प्रादुर्भाव होतो. इनफ्लुएंझा A हा टाइम महामारीसाठीही ओळखला जातो. या टाइप A चे दोन सबटाइम असतात एक असतो H3N2 आणि दुसरा H1N1. इनफ्लुएंझा टाइम B चे सबटाइप नसतात. टाइप सी हा फारसा गंभीर नाही. तर टाइप डी हा प्राण्यांमध्ये असतो.

ICMR ने दिल्या माहिनुसार गेल्या काही महिन्यांपासून करोनाची प्रकरणं कमी झाली आहेत. मात्र H3N2 प्रकरणं वाढत आहेत. १५ सप्टेंबर नंतर H3N2 ची प्रकरणं वाढली आहेत.

H3N2 ची लक्षणं काय आहेत?

Who ने दिलेल्या माहितीनुसार H3N2 संक्रमित रूग्णांमध्ये खोकला, कोरडा खोकला, ताप, डोकेदुखी, सांध्यांमध्ये दुखणं, थकवा येणं, गळ्यात खरखर आणि नाक वाहणं ही लक्षणं दिसतात. सुरूवातीला अनेक रूग्णांना ताप येतो त्यानंतर सर्दी, खोकला आणि अंगदुखी तसंच इतर लक्षणं दिसू लागतात असंही WHO ने म्हटलं आहे. तसंच अनेक रूग्णांमध्ये ताप आला पाच ते सात दिवसात बरा होतो पण सर्दी-खोकला बरा व्हायला दोन ते तीन आठवडे जातात.

इन्फ्लुएंझाचा कुणाला जास्त धोका?

इनफ्लुएंझाची लागण कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते. मात्र या आजाराचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिला, पाच वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं, म्हातारी माणसं आणि आजारांशी लढणारे रूग्ण यांना जास्त धोका असू शकतो. हा संसर्गजन्य आजार असल्याने एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असा सल्ला WHO ने दिला आहे.

नेमकी काळजी कशी घ्याल?

गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क आवर्जून लावा
आपले डोळे आणि नाक यांना वारंवार स्पर्श करू नका
खोकला आल्यावर किंवा शिंक आल्यावर तोंडावर रूमाल ठेवा
अंगदुखी किंवा ताप आला तर पॅरासिटामोल घ्यावी

नेमकं काय टाळावं?

एकमेकांशी हात मिळवणं शक्यतो टाळावं
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक घेऊन नये
अगदी शेजारी-शेजारी बसून खाऊ नये