अयोध्या : अयोध्येत राम राज्य येत आहे, आता देशातील सर्वांनी वाद संपवून, एकजूट राखावी असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. जास्त हाव न ठेवता शिस्तबद्ध जीवन जगा अशी सूचना करत, देशाला विश्वगुरू करण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काम करावे लागेल असे आवाहन त्यांनी केले.

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळयात सरसंघचालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेपूर्वी पंतप्रधानांनी तप केला, मात्र आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे सरसंघचालकांनी जनसमुदायापुढे स्पष्ट केले.

हेही वाचा >>> कायद्याचे पालन करावे, तोंडी आदेशांचे नाही! सर्वोच्च न्यायालयाचे तमिळनाडू प्रशासनाला निर्देश

 हा सोहळा म्हणजे, नव्या भारताचे प्रतीक असून, आपण जगाच्या मदतीसाठी पुढे येऊ असे त्यांनी सांगितले. अनेक कार्यकर्त्यांच्या त्यागामुळेच, पाचशे वर्षांनंतर हे शक्य झाले. आता अहंकार सोडून एकजूट दाखवावी लागेल असे स्पष्ट केले. करुणा ही यातील दुसरी पायरी आहे. कमाईतील स्वत:पुरते किमान ठेवून, दान करा. सरकारी योजना गरिबांना दिलासा देत आहेत.

रामराज्याची सुरुवात – योगी आदित्यनाथ

अयोध्येतील हा सोहळा म्हणजे रामराज्याची सुरुवात आहे अशा भावना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनसमुदापुढे व्यक्त केल्या. अयोध्येत आता गोळीबार किंवा संचारबंदी लागणार नाही. ही ऐतिहासिक घटना असून, राष्ट्रीय अभिमानाची ही बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

 यावेळी साधुसंत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर अशा आठ हजार निमंत्रित उपस्थित होते. अनेक शतके अयोध्येकडे दुर्लक्ष झाले. मात्र आज अयोध्येचे स्वरूप पाहून जगभरातून कौतुक होत आहे. हे शहर आता जगाची सांस्कृतिक राजधानी म्हणून स्थापित झाल्याचे आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवसभरात १०० हून अधिक विमानांची वर्दळ नवी दिल्ली : प्राणप्रतिष्ठा सोहळयासाठी अयोध्येत अनेक मान्यवर आल्याने शहरातील विमातळावर १०० पेक्षा अधिक विमानांचे अवतरण- उड्डाण होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सात हजारांहून अधिक नागरिक आले आहेत. अयोध्या विमानतळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, समारंभानंतर नागरिक परत जाण्यास सुरुवात करतील. त्यामुळे १०० पेक्षा अधिक विमानांच्या हालचाली विमानतळावर होतील. दुपारी २.३० वाजेपर्यंत विमानतळावर खासगी मालकीच्या विमानांसह १८ विमानांचे अवतरण आणि १७ विमानांचे उड्डाण झाले.