राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता सांस्कृतिक संघटना म्हणून काम करणे सोडून पूर्णपणे राजकारण करावे, असा सल्ला काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी दिला आहे.
ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले आहे, जर हे राजकारण नसेल तर दुसरे काय आहे मला समजत नाही.विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख गेली अनेक वर्षे जी भाषणे करीत आले आहेत त्यात नेहमी राजकारण व पाकिस्तानचा उल्लेख करीत आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सांस्कृतिक संघटना म्हणवून घेणे आवडते पण त्यांनी संस्कृतीसाठी दुरान्वयानेही काही केलेले नाही, असे दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे.