घसरता रुपया आणि तेलाच्या वाढत्या किमतीमुळे देशासमोर गंभीर आर्थिक समस्या उदभवली असताना, देशवासियांनी सोने खरेदीला लगाम घातला पाहिजे. त्याचबरोबर पेट्रोलियम पदार्थांचा वापर जपून केला पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शुक्रवारी लोकसभेमध्ये केले. देशापुढील आर्थिक समस्येवर डॉ. सिंग यांनी लोकसभेमध्ये सविस्तर निवेदन केले. 
पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे

  • रुपयाचे अवमूल्यन हा चिंतेचा विषय
  • रुपयाच्या घसरणीला अचानक उदभवलेले परदेशी घटकही कारणीभूत
  • चालू खात्यावरील तूट या आर्थिक वर्षामध्ये ७० अब्ज डॉलरपर्यंत खाली आणण्याचा सरकारला विश्वास
  • प्रगत देशांपेक्षा भारतामध्ये चलनवाढीचा दर जास्त
  • रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅकेने अनेक उपाय योजले आहेत
  • वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) ४.८ टक्के ठेवण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करणार
  • रुपयाचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता