scorecardresearch

भारताला दिलासा देणारी बातमी : “युक्रेन-रशिया सीमेवर…”; संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेसमोर रशियाची माहिती

अल्बानिया, फ्रान्स, आर्यलॅण्ड, नॉर्वे, युनाटेड किंग्डम आणि अमेरिकने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली होती.

UNSC Russia
युक्रेन-रशिया सीमेवरील एक महत्वाची बाब रशियाने संयुक्त राष्ट्रांंना सांगितली (फाइल फोटो)

रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला युक्रेनमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांसंदर्भात एक महत्वाची माहिती दिलीय. (युक्रेन युद्धाचे लाइव्ह अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.) आम्ही युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व परदेशी नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी मदत करण्यास तयार असल्याचं रशियाने म्हटलंय. यासाठी रशियाने युक्रेनच्या सीमेवर बसही तयार ठेवल्याचा दावा केलाय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन तोफा, गाड्यांवर Z, O, X, V अक्षरं का लिहिली आहेत? त्यांचा अर्थ काय?

नक्की काय सांगितलं रशियाने?
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला रशिया-युक्रेनच्या सीमेवर युक्रेनमध्ये अडकलेल्यांना युद्धग्रस्त देशातून बाहेर काढण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आलीय अशी माहिती दिलीय. “युक्रेन-रशिया सीमेवर रशियन बस तयार आहेत. या बस युक्रेनमधील खार्किव्ह आणि सुमी या शहरांमध्ये अडकून पडलेल्या परदेशी व्यक्तींना (यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे) युक्रेनमधून बाहेर काढण्यास तयार आहेत,” असं रशियाने संयुक्त राष्ट्रांना सांगितलंय. मात्र यासाठी संयुक्त राष्ट्रांकडून होकार येण्याची अपेक्षा असल्याचे संकेत रशियाने दिलेत.

नक्की वाचा >> Ukraine War: आता NATO वरच युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांनी साधला निशाणा; म्हणाले “यापुढे जे मृत्यू होतील त्यासाठी…”

बैठक का बोलवण्यात आली?
संयुक्त राष्ट्रांमधील सदस्य देश असणाऱ्या अल्बानिया, फ्रान्स, आर्यलॅण्ड, नॉर्वे, युनाटेड किंग्डम आणि अमेरिकने आपत्कालीन बैठक बोलावली होती. झापोरिझ्झिया अणुऊर्जाप्रकल्प शुक्रवारी ताब्यात घेतला. हा युरोपातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. याच पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आलेली. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील कायमचं सदस्यत्व असणाऱ्या रशियाचे राजदूत व्हिस्ली नेबेन्झीया यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी रशिया शक्यते सर्व प्रयत्न करत आहे, असं सांगितलं.

नक्की वाचा >> Ukraine War: “माझ्यासोबत बसा, आपण अगदी…”; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांना सुचवला ‘युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग’

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी..
युद्धग्रस्त भागांतून नागरिकांना सुरक्षित बाहेर पडता यावे, यासाठी कॉरिडॉर तयार करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवल्याचे रशियाशी वाटाघाटी करण्यास पाठवलेल्या युक्रेनच्या शिष्टमंडळातील एका सदस्याने सांगितले. नागरिकांसाठी तयार केलेल्या कॉरिडॉरच्या भागात युद्धविराम असेल, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचे सल्लागार मायखाइलो पोदोलियाक यांनी दिली.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांच्यासोबतच्या ९० मिनिटांच्या कॉलनंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचा धोक्याचा इशारा; म्हणाले, “भविष्यात युक्रेनसाठी…”

अनेक भारतीय अडकून पडलेत…
रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन आठवडा उलटला तरी हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना मायदेशी लवकरात लवकर परतण्याचे वेध लागले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना आतापर्यंत भारत सरकारच्या ऑपरेशन गंगाअंतर्गत भारतात परत आणण्यात आलंय.

नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल

शुक्रवारी नेमकं काय काय घडलं?
दक्षिण युक्रेनमध्ये युद्धाची तीव्रता वाढली आहे. येथील मारियुपॉल, चेर्निहाइव्ह आणि खार्किव्ह येथे गोळीबार, क्षेपणास्त्र मारा सातत्याने सुरु आहे. खेर्सन शहरावर रशियाने ताबा मिळवला आहे. तर दुसरीकडे अझोव्ह समुद्रावरील मोक्याच्या बंदराच्या सीमेवर असणाऱ्या मारियुपोल शहरामध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. काळ्या समुद्राच्या बंदरातील स्थानिक सरकारी मुख्यालय रशियाने ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला युक्रेनियन अधिकाऱ्यांचा दुजोरा दिलाय. आठवड्याभरात युक्रेनमधून १० लाखांहून अधिक नागरिकांचे शेजारी देशांमध्ये स्थलांतर केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिलीय.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Russia ready to evacuate indian students other foreign nationals from ukraine envoy tells unsc scsg

ताज्या बातम्या