वृत्तसंस्था, कीव

रशियाने डागलेली तीन क्षेपणास्त्रे बुधवारी उत्तर युक्रेनमधील चेर्निहाइव्हमधील आठ मजली इमारतीवर पडली त्यात १३ जणांचा मृत्यू झाला. स्थानिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

युक्रेनच्या आपत्कालीन सेवेने सांगितले की, या हल्ल्यात दोन मुलांसह किमान ६१ लोक जखमी झाले आहेत. चेर्निहाइव्ह हे राजधानी कीवच्या उत्तरेस १५० किलोमीटर अंतरावर, रशिया आणि बेलारूसच्या सीमेजवळ आहे. पाश्चात्य देशांनी युक्रेनला अतिरिक्त लष्करी उपकरणे न दिल्याने रशियाविरुद्धच्या युद्धात त्याची स्थिती कमकुवत होत आहे. युद्ध सुरू होऊन तीन वर्षे झाली आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पाश्चात्य देशांना आपल्या देशाला अधिक हवाई संरक्षण यंत्रणा पुरवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी चेर्निहाइव्ह हल्ल्याबद्दल सांगितले की, ‘युक्रेनला पुरेशी हवाई संरक्षण उपकरणे मिळाली असती आणि जगाने रशियन दहशतवादाचा मुकाबला केला असता, तर असे झाले नसते.’ क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी युक्रेनकडे हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे संपली आहेत. अलीकडेच, रशियाने एका हल्ल्यात युक्रेनचा सर्वात मोठा वीज प्रकल्प नष्ट केला.

हेही वाचा >>>Dubai Flood: दुबईची झाली डुबई! दोन वर्षांचा पाऊस एकाच दिवसात, वाळवंटात आला पूर, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वॉशिंग्टनस्थित थिंक टँक इन्स्टिटय़ूट फॉर द स्टडी ऑफ वॉर (आयएसडब्ल्यू) च्या मते, युक्रेनमध्ये लष्करी उपकरणे झपाटय़ाने कमी होत आहेत. युक्रेनला दिल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या लष्करी मदतीच्या तरतुदीत विलंब झाल्यामुळे रशिया वेगाने प्रगती करत आहे. अमेरिकेच्या मदतीशिवाय युक्रेन युद्धभूमीवर फार काळ टिकू शकत नाही, असे आयएसडब्ल्यू मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.