बलात्कारापासून वाचण्यासाठी रशियन मॉडेलने मारली सहाव्या मजल्यावरुन उडी

आरोपीला पकडण्यात यश

प्रातिनिधिक छायाचित्र

अमेरिकेतील एका प्रख्यात व्यावसायिकाने दुबईमध्ये एका रशियन मॉडेलवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नापासून वाचण्यासाठी या मॉडेलने चक्क ह़ॉटेलच्या सहाव्या मजल्यावरुन खाली उडी मारली. या अपघातात तिचा पाठीच्या कण्याला गंभीर इजा झाली आहे. आरोपीने शरीरसंबंधांची मागणी केल्यावर या मॉडेलने त्यासाठी नकार दिला, त्यावेळी आरोपीने या मॉडेलला चाकूचा धाक दाखवत तो तिच्या अंगावर धावून गेला. तेव्हा स्वत:चा बचाव करण्यासाठी तिने सहाव्या मजल्यावरुन खाली उडी मारली. इतक्या उंचावरुन उडी मारुनही तिचा जीव वाचला ही आश्चर्यकारक गोष्ट आहे असे या मॉडेलच्या मैत्रिणीने सांगितले.

हा आरोपी घटनेनंतर दुबईतून पळून जात होता. त्यावेळी त्याला विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. संबंधित प्रकरणातील रशियन मॉडेलच्या आईने आपल्या मुलीबाबत अफवा पसरवल्या जात असल्याची तक्रार केली आहे. घडलेल्या प्रकरणामुळे माझी मुलगी अपराधी असल्याची भावना बाळगून असल्याचेही त्यांनी सांगितले. दुबईतील रशियन दूतावासाकडून या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असून संबंधित आरोपीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्याला १५ वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ही मॉडेल मागच्याच महिन्यात एक नवीन काम मिळाल्याच्या निमित्ताने दुबईमध्ये आली होती. त्यादरम्यान हा प्रकार घडला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Russian model jumps from 6th floor of hotel to escape from rape