रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येऊ शकतात, अशी शक्यता क्रेमलिनचे प्रवक्ता दिमित्री पेस्कोव यांनी मंगळवारी वर्तविली. दौऱ्याचा तपशील अद्याप निश्चित झाला नसला, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निमंत्रणावरून ही भेट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : ५६वा व्याघ्रप्रकल्प लवकरच, छत्तीसगडमध्ये देशातील तिसरा मोठा प्रकल्प

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुलै महिन्यात पुतिन आणि मोदी यांच्यात मॉस्को येथे द्विपक्षीय चर्चा झाली होती. त्या वेळी अमेरिकेसह युरोपीय राष्ट्रांनी भारत-रशिया संबंधांवर टीका केली होती. आता पुतिन यांचा भारत दौरा निश्चित होत असल्याने आता यावर पाश्चिमात्य राष्ट्रे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. पुतिन यांच्या भारत भेटीपूर्वी अमेरिकेमध्ये सत्तांतर होणार असून भू-राजकीय परिस्थितीत मोठे बदल होण्याची शक्यता असल्यामुळे मोदी-पुतिन भेटीला वेगळे महत्त्व असेल.