भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकर गुरूवारी राज्यसभेत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दोन दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी सभागृहातील अनुपस्थितीच्या मुद्द्यावरून सचिन तेंडुलकर व अभिनेत्री रेखा यांच्यावर आगपाखड केली होती. त्यानंतर लगेचच सचिनने राज्यसभेच्या आजच्या कामकाजाला हजेरी लावल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. यावेळी सचिन बराच काळ सभागृहातील चर्चा ऐकत बसला होता. नरेश अग्रवाल यांनी मंगळवारी रेखा आणि सचिन तेंडुलकर यांच्या गैरहजेरीवर राज्यसभेत चांगलाच हंगामा केला होता.

सचिन तेंडुलकर आणि रेखा यांना जर राज्यसभेत यायचं नाही तर त्यांनी सरळ खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली होती. मला हा मुद्दा वारंवार उचलावा लागतो आहे असं म्हणत त्यांनी आज पु्न्हा एकदा सचिन तेंडुलकर आणि रेखा यांच्या अनुपस्थितीवर त्यांनी बोट ठेवलं. या दोघांकडे जाहिराती करायला वेळ आहे इतर ठिकाणी जायला वेळ आहे, मग राज्यसभेत यायला वेळ का नाही? असा बोचरा सवाल अग्रवाल यांनी उपस्थित केला होता.

nilesh kumbhani
भाजपा उमेदवाराला जिंकून देणारा काँग्रेस उमेदवार बेपत्ता; गुजरातमध्ये नक्की काय घडतेय?
Balasaheb Thorat, Amar Kale, wardha,
माजी मंत्री मामा आहेच, आता माजी मंत्री असलेले मामसासरेही जावयाच्या दिमतीस, कोण हे उमेदवार?
Kolhapur, Kolhapur Lok Sabha,
प्रचार लोकसभेचा पण मशागत विधानसभेची
Ashok Chavan
“राज्यातलं काँग्रेस नेतृत्व कमकुवत”, सांगली-भिवंडीच्या जागेवरून अशोक चव्हाणांचा खोचक टोला; नेमका रोख कोणाकडे?

कला आणि क्रीडा या विभागातून नामवंत व्यक्तींना खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवलं जातं मात्र रेखा आणि सचिन तेंडुलकर यांनी मागील तिन्ही अधिवेशनात हजेरी लावली नाही. ते राज्यसभेत आले आहेत अशी वेळ अत्यंत कमीवेळा आली आहे. खासदार म्हणून या दोघांनाही राज्यसभेवर येण्यात स्वारस्य नसेल तर त्यांनी सरळ खासदारकी सोडावी आणि घरी जावं, मात्र राज्यसभेची खासदारकी घ्यायची आणि तिथले नियम पाळायचे नाहीत याला काय अर्थ आहे? , असे अग्रवाल यांनी म्हटले होते.

हिवाळी अधिवेशान हे दोघे एकदा राज्यसभेत आले अर्थसंकल्प अधिवेशनात एकदा हजेरी लावली, तर आता सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात ते एकदाही आलेले नाहीत. जाहिराती करण्यासाठी या दोघांकडे वेळ आहे मात्र राज्यसभेत यायला वेळ नाही. त्यांना या अधिवेशनात आणि लोकांच्या प्रश्नात काहीही स्वारस्य नाही हेच त्यांची गैरहजेरी दाखवून देते आहे. याआधी देखील हा मुद्दा वारंवार मांडला गेला आहे मात्र त्यांना कोणीही सदनात येण्याबाबत खडसावत नाही. सचिन तेंडुलकर आणि रेखा यांना लोकांच्या प्रश्नांशी घेणंदेणं नाहीये त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी नरेश अग्रवाल यांनी केली होती. मात्र, त्यावेळी राज्यसभेचे उपसभापती जे. पी. कुरियन यांनी या दोघांनाही सुट्टी दिल्याचे स्पष्ट केले होते.