सोशल मीडियावर चर्चेत राहणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभा खासदार शशी थरूर सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. खासदार थरूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो कॅप्शनसह पोस्ट केला आहे. सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होताच शशी थरूर यांनी संसदेच्या आवारातून एक फोटो पोस्ट केला, जो चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात शशी थरूर यांच्यासह अनेक महिला खासदारही आहेत.

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पटियालाच्या खासदार प्रनीत कौर, दक्षिण चेन्नईच्या खासदार थमिझाची थंगापांडियन, जादवपूरच्या खासदार मिमी चक्रवर्ती, बशीरहाटच्या खासदार नुसरत जहाँ आणि करूरच्या खासदार एस जोथिमनी यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत शशी थरूर सर्व महिला खासदारांसोबत उभे असल्याचे दिसत आहे.

शशी थरूर यांनी या फोटोला कॅप्शनही दिले असून, ‘कोण म्हणतं लोकसभा ही कामासाठी आकर्षक जागा नाही? सकाळी माझ्या सहकारी खासदारांसोबत, असे म्हटले आहे. मात्र थरुर यांच्या या सेल्फी फोटोवरील कॅप्शनवरुन नवा गोंधळ सुरु झाला आहे. शशी थरूर यांच्या या ट्विटवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावरही लोक शशी थरूर यांना त्यांच्या कॅप्शनसाठी ट्रोल करत आहेत.

त्यानंतर मात्र थरुर यांनी याबाबत प्रतिक्रिया देत माफी मागितली आहे. थरूर यांनी काही लोकांना दुखावल्याबद्दल माफी मागितली आणि महिला खासदारांच्या पुढाकाराने हा फोटो विनोदी पद्धतीने काढण्यात आल्याचे सांगितले आणि त्यांनीच मला त्याच भावनेने ट्विट करण्यास सांगितले, असेही थरुर यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळेंसहीत महिला खासदारांसोबत थरुर यांनी शेअर केलल्या फोटोची कॅप्शन चर्चेत; म्हणाले, “कोण म्हणतं लोकसभा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थरुर यांच्या या ट्विटवर अनेक युजर्सनी आक्षेप घेतला आहे. यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी महिलांना आकर्षणाचा विषय बनवून तुम्ही संसद आणि राजकारणातील तिच्या योगदानाचा अपमान करत आहात. संसदेत महिलांना आक्षेपार्ह बनवणे बंद करा, असे म्हटले.