कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बेळगाव दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी ते ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’चे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचारात सहभागी झाले. या प्रचारसभेतून राऊतांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

“भारतीय जनता पार्टीवाले चोर आणि लफंगे आहेत, गाफील राहू नका” अशा शब्दांत संजय राऊतांनी टीकास्र सोडलं. यावेळी राऊत म्हणाले, “मुरलीधर पाटील आपण या भागातील लोकप्रिय सामाजिक नेते आहात, एकीकरण समितीचे कार्यकर्ते आहात. आपण सहकार क्षेत्रात काम करता, तरीही गाफील राहू नका. भारतीय जनता पार्टीवाले चोर आणि लफंगे आहेत, हे लक्षात घ्या.

हेही वाचा- “नाना पटोले आमचे प्रदेशाध्यक्ष, त्यांना गांभीर्यानं घेत नाही म्हणणं..” अशोक चव्हाणांनी संजय राऊत यांना सुनावलं

“भाजपावाले कधी काय करतील हे सांगता येत नाही. ते पक्के मराठी द्वेष्टे आणि महाराष्ट्र द्वेष्टे आहेत. त्यांना मराठी माणसाचा आवाज बुलंद झालेला दिसला की ताबोडतोब कारस्थानं करतात. मग तो महाराष्ट्र असो किंवा सीमाभाग असो” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा- अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत दोन गट पडले? जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, त्यांनी ईव्हीएम मशीनला पहारा देण्याचा सल्ला दिला आहे. “ईव्हीएम मशीनचा पहारा करा. भाजपाचा विजय फक्त बटनावर होत नाही. सकाळी आपण दिलेलं मत संध्याकाळी कसं बदलेलं, याचा भरोसा नसतो, ही काळजी घेतली पाहिजे. भाजपाला लोकांचा पाठिंबा नाही, हे घोटाळे करून निवडून येतात,” असंही राऊत म्हणाले.