एसबीआय डिजिटल व्यवहार करणाऱ्या खातेदारांसाठी बँकेनं महत्त्वाची सूचना दिली आहे. खातेदारांना यूपीआय, इंटरनेट बँकिंक, योनो आणि योन लाइट सुविधा वापरताना काही तास अडचणीचा सामना करावा लागणार आहे. एसबीआय ६ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री १० वाजून ४५ मिनिटांपासून ७ ऑगस्टला मध्यरात्री १ वाजून १५ पर्यंत देखभालीचं काम हाती घेणार आहे. त्यामुळे ऑनलाइन सुविधा वापरता येणार नाहीत. जवळपास दोन तास ही सुविधा बंद असणार आहे. बँकेनं खातेदारांना याबाबतची आगाऊ सूचना दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“बँक ६ ऑगस्ट २०२१ ला रात्री १०.४५ ते ७ ऑगस्टला रात्री १.४५ मिनिटापर्यंत देखभालीचं काम करणार आहे. जवळपास १५० मिनिटं आपल्याला सुविधा मिळणार नाही. बँकिंग सुविधा अपग्रेड करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”, असं ट्वीट एसबीआयनं केलं आहे. यापूर्वी १६ जुलै, १३ जूनला एसबीआयने देखभालीचं काम हाती घेतलं होतं. मे महिन्यातही एसबीआयची योनो, योनो लाइट, इंटरनेट बँकिंग, यूनिफाइड पेमेंटसह डिजिटल बँकिंग खंडित झाली होती.

एसबीआय देशातील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआयच्या देशात २२ हजाराहून अधिक शाखा आहेत. तसेच ५७ हजार ८८९ एटीएम आहेत. तर इटरनेट बँकिंग ८.५ कोटी आणि मोबाईल बँकिंगचा उपयोग १.९ कोटी खातेदार करत आहेत. तर यूपीआयचा वापरर करणाऱ्या खातेदारांची संख्या १३.५ कोटी आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi will undertake maintenance work rmt
First published on: 05-08-2021 at 15:09 IST