मुख्य दक्षता आयुक्तांच्या निवड प्रक्रियेला आव्हान देणाऱया जनहित याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला नोटीस बजावली. केंद्र सरकारने चार आठवड्यांमध्ये आपली बाजू मांडावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठात या याचिकेवर सुनावणी झाली.
मुख्य दक्षता आयुक्तांची निवड करणाऱया समितीतील सर्व सदस्यांचे एकमत झाल्यानंतर संबंधितांची निवड करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. त्याचबरोबर ही प्रक्रिया आणखी पारदर्शक करण्यात यावी आणि सर्व उमेदवारांची नावेही जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवड समितीमध्ये सध्या पंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांचा समावेश आहे. सध्या मुख्य दक्षता आयुक्तांची निवड समितीतील सदस्यांच्या बहुमताने केली जाते.
संग्रहित लेख, दिनांक 4th Aug 2014 रोजी प्रकाशित
मुख्य दक्षता आयुक्तांच्या निवडीवरून केंद्र सरकारला नोटीस
मुख्य दक्षता आयुक्तांच्या निवड प्रक्रियेला आव्हान देणाऱया जनहित याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला नोटीस बजावली.

First published on: 04-08-2014 at 02:23 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc seeks centres response on plea challenging cvcs selection process