माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नोटीस बजावली. तेजिंदर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून सिंग यांना नोटीस बजावण्यात आली. या खटल्याची पुढील सुनावणी नऊ डिसेंबरला होणार आहे.
व्ही. के. सिंग यांना न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी तेजिंदर सिंग यांनी याचिकेद्वारे न्यायालयाकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले असतानाही व्ही. के. सिंग सातत्याने आपली बदनामी करीत असल्याचा दावा तेजिंदर सिंग यांनी याचिकेमध्ये केला आहे.
टेट्रा ट्रक व्यवहारामध्ये तेजिंदर सिंग यांनी आपल्याला लाच देण्याची तयारी दाखविली होती, असा आरोप व्ही. के. सिंग यांनी त्यांच्यावर केला होता. यानंतर तेजिंदर सिंग यांनी व्ही. के. सिंग यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल केला.
संग्रहित लेख, दिनांक 28th Nov 2013 रोजी प्रकाशित
माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नोटीस बजावली.
First published on: 28-11-2013 at 04:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc serves notice to v k singh seeks reply on bail cancellation plea