‘नीट’ला असलेल्या विरोधाची कारणे ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर केंद्र सरकार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ(सीबीएसई) आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले असून, याबाबत आज सुनावणी ठेवली आहे. यामुळे एमएचटी-सीईटी द्यायची की नाही, अशा संदभ्रात वैद्यकीय प्रवेशोच्छुक विद्यार्थी होते. महाराष्ट्रसह विविध राज्यांनी, अल्पसंख्याक व खासगी संस्थांनी आणि विद्यार्थ्यांनीही निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने एमएचटी-सीईटी परीक्षेबरोबरच न्यायालयाच्या निकालाची धाकधूकही विद्यार्थ्यांच्या मनात आहे.

VIDEO: जाणून घ्या, ‘नीट’ प्रवेश परीक्षेची संपूर्ण माहिती-