न्यायालयही पुनर्विचार करण्यास तयार
खलिस्तानी दहशतवादी देविंदरपाल सिंग भुल्लर याने आपली फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप द्यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेबाबत फेरविचार करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.
फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींनी सरकारकडे दयेचे अर्ज केले आहेत. मात्र या अर्जाबाबत विलंबाने निर्णय होत असल्याचे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने १५ आरोपींच्या फाशीची शिक्षा रद्द करून तिचे रूपांतर जन्मठेपेत केले. या पाश्र्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने भुल्लर याच्या पत्नीने दाखल केलेल्या याचिकेवर येत्या २८ आणि २९ जानेवारी रोजी सुनावणी करण्याचे मुख्य न्या. पी. सत्यशिवम यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मान्य केले.
भुल्लर हा मानसिक रोगी असून त्याची फाशी रद्द करून जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्याच्या पत्नीने न्यायालयात केली आहे.
सप्टेंबर १९९३ मध्ये दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटात पाच जण ठार तर २५ जण गंभीर जखमी झाले होते. मृतांमध्ये युवक काँग्रेस अध्यक्ष एम. एस. बिट्टा यांचाही समावेश होता. या हल्ल्यात भुल्लर हा आरोपी असून त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2014 रोजी प्रकाशित
फाशी रद्द करण्यासाठी भुल्लरही सर्वोच्च न्यायालयात
खलिस्तानी दहशतवादी देविंदरपाल सिंग भुल्लर याने आपली फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप द्यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेबाबत फेरविचार करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.
First published on: 25-01-2014 at 02:59 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc to relook at bhullars plea for life