पीटीआय, नूह

अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्यानंतरही सर्वजातीय हिंदू महापंचायतीने सोमवारी ‘शोभायात्रा’ काढण्याचे आवाहन केल्यामुळे हरियाणातील नूह आणि आसपासच्या भागांत सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.कडेकोट बंदोबस्तासाठी निमलष्करी दलांसह सुरक्षा दलांचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा सीमांवरील सुरक्षाव्यवस्थाही आवळण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काही आठवडय़ापूर्वी नूहमध्ये झालेल्या हिंसाचाराचा संदर्भ देऊन, या यात्रेसाठी परवानगी देण्यात आली नसल्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी रविवारी पंचकुला येथे सांगितले. या यात्रेऐवजी लोक ‘जलाभिषेकासाठी’ त्यांच्या भागांतील मंदिरांमध्ये जाऊ शकतात असे ते म्हणाले. कायदा व सुव्यवस्था राखणे ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

हेही वाचा >>>प्रिगोझिन यांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब; वैद्यकीय चाचणीच्या आधारे रशियाच्या तपास समितीचा दुजोरा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२८ ऑगस्ट हा श्रावणाच्या पवित्र महिन्यातील अखेरचा सोमवार आहे.नूहमध्ये ३ ते ७ सप्टेंबर या कालावधीत होत असलेल्या ‘जी २०’ शेर्पा गटाच्या बैठकीमुळे, तसेच ३१ जुलैला झालेल्या हिंसाचारानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने यात्रेसाठी परवानगी नाकारल्याचे पोलीस महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी शनिवारी सांगितले.२६ ते २८ ऑगस्ट दरम्यान मोबाइल इंटरनेट सेवा स्थगित ठेवण्याची घोषणाही सरकारने केली आहे.कुठलीही अनुचित घटना रोखण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) ममता सिंह यांनी रविवारी सांगितले.