उत्तर प्रदेश पोलिसांनी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अझीज कुरेशी यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कुरेशी यांच्यावर रविवारी ही कारवाई करण्यात आली आहे. रामपूर जिल्ह्यातील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात भाजप कार्यकर्ता आकाश सक्सेनाच्या तक्रारीवरून कुरेशीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकाश सक्सेना यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलंय की, कुरेशी माजी मंत्री आझम खान यांच्या घरी त्यांची पत्नी आणि रामपूरच्या आमदार तंझीम फातिमा यांना भेटण्यासाठी गेले होते. जिथे त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारची तुलना “सैतान आणि रक्त शोषक राक्षस” अशी केली होती. कुरेशी यांचे हे वादग्रस्त वक्तव्य दोन समुदायामध्ये तणाव निर्माण करू शकते आणि जातीय दंगली घडवून आणू शकते, असा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.

एफआयआरच्या कॉपीनुसार, माजी राज्यपालांवर कलम १५४ ए अंतर्गत राजद्रोह, १५३ ए अंतर्गत जाती-धर्मातील वैर वाढवणे आणि  राष्ट्रीय एकता आणि अखंडतेविरोधात वक्तव्य केल्याबद्दल १५३ बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच लोकांमध्ये भ्रम आणि दहशत पसरवण्यासाठी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sedition fir against former uttar pradesh governor aziz qureshi over his comment on yogi adityanath hrc
First published on: 06-09-2021 at 11:34 IST