सोशल मिडियावर एक व्हिडिओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. जो व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल आणि भावनिक सुद्धा, कारण हा व्हिडीओ एका .! ८० वर्षाच्या आजीचा आहे. ही आजी ८०व्या वर्षीही कष्ट करून स्वत:च्या पायावर उभी आहे. ही आजी ज्यूस विकून आपला उदर्निवाह करत आहे. हा व्हिडिओ पंजाबच्या अमृतसरचा असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ अरिफ शहा नावाच्या ट्विटर युजरने शेअर केला आहे. राष्ट्रीय स्तरावरील माजी गोल्फर जस्मीन दुग्गल यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. इतकेच नाही तर व्हिडिओला बॉलीवूड दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनीही रिट्वीट केले आहे.
“ही 80 वर्षांची ही आजी अमृतसरमध्ये एक स्टॉल चालवते. ती आपल्या वृद्धपकाळात आपले पोट भरण्यासाठी आजी कष्ट करत आहे. ती काही वेळापासून ग्राहकांची वाट पाहत आहे. या आजीचा स्टॉल उप्पल न्यूरो हॉस्पिटल जवळ रानी दा बागेत आहे. कृपया त्यांच्या स्टॉलला भेट द्या, मदत करा जेणेकरून ते काही पैसे कमवू शकेल.” असे व्हिडिओ शेअर करताना करण्यात आले आहे.
Dear #Amritsar friends do stop by at her stall and help this sweet lady to earn her meals. Address below https://t.co/ovK904WVa2
— JASMEEN DUGAL (jasmeenGdugal) July 28, 2021
जस्मीन दुग्गलनेही हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, “अमृतसरच्या प्रिय मित्रांनो, या आजींच्या स्टॉलवर थांबा आणि त्यांना त्यांचे पोट भरण्यासाठी हातभार लावा” व्हायरल व्हिडिओमध्ये हे दिसून येते की वयाच्या ८०व्या वर्षी हसत हसत ही आजी खूप कष्ट घेत आहे.