दहा किंवा त्यापेक्षा जास्त मुले असलेल्या हिंदू कुटुंबाला २१ हजार रुपये देऊ अशी घोषणा उत्तरप्रदेशमधील शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल सिंह यांनी केली आहे. ‘राष्ट्र हितासाठी हिंदुंची संख्या वाढावी’ यासाठी ही मोहीम राबवणार असल्याचे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी म्हटले आहे.
आम्ही उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्हाध्यक्षांना अशा कुटुंबांची माहिती घेण्यास सांगितले आहे. अशा कुटुंबांना बक्षीस देण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी प्रत्येक कुटुंबाला २१ हजार रुपये रोख आणि राष्ट्रहितासाठी हिंदुंची संख्या वाढविल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच हिंदू कुटुंबीयांकडून होत असलेल्या कुटुंब नियोजनाविरोधात आंदोलनही करण्यात येणार आहे, असे शिवसेनेचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अनिल सिंह म्हणाले. कुटुंब नियोजनाचा निषेध म्हणून १ नोव्हेंबररोजी उत्तरप्रदेशमधील आरोग्य केंद्रांना टाळे ठोकून आंदोलन करणार असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले. शाह यांच्या पक्षाने सात वर्षांपूर्वीही लखनऊमध्ये ही मोहीम राबवली होती. त्यावेळी बक्षीसाची रक्कम ११ हजार रुपये ठेवण्यात आली होती असेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Oct 2014 रोजी प्रकाशित
दहा मुले असलेल्या हिंदू कुटुंबाला शिवसेना देणार २१ हजारांचं बक्षीस
दहा किंवा त्यापेक्षा जास्त मुले असलेल्या हिंदू कुटुंबाला २१ हजार रुपये देऊ अशी घोषणा उत्तरप्रदेशमधील शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल सिंह यांनी केली आहे.
First published on: 26-10-2014 at 03:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sena offers cash to hindu families with 10 or more children