नवी दिल्ली : लहान शहरे व ग्रामीण भागात लसीकरणासाठी ‘सीआयआय’  सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या मदतीने काम करणार आहे.   चेंबरने म्हटले आहे, की सीरम इन्स्टिट्यूटबरोबर भागीदारी करून आम्ही ग्रामीण व लहान शहरांत लसीकरणासाठी प्रयत्न करू. ‘सीआयआय’चे अध्यक्ष टी.व्ही. नरेंद्रन यांनी सांगितले, की कामगारांच्या लसीकरणात उद्योग महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. लसीकरणाची मोेठी गरज असून सरकारही लशीचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितले, की संबंधितांसमवेत एकत्र काम करण्याची गरज आहे. आम्ही सीआयआयबरोबर भागीदारी करीत आहोत. कोविशिल्ड लशीचा  पुरवठा आम्ही करणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रामीण व शहरी भागातील लसीकरणाची तफावत दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

संपूर्ण भारताचा विचार करता  लशींची मागणी वाढत आहे. सीआयआयच्या एका सर्वेक्षणासानुसार १९६ शहरातील तीन हजार कंपन्यांनी लसीकरणाच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला होता. २३ जुलै २०२१ पर्यंत ७० लाख लशींची गरज होती. एकूण ३४  लाख ७५ हजार ३०१ इतक्या प्रमाणात ४३० शिबिरातून लशीची पहिली मात्रा देण्यात आली. यापुढेही लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार असून राज्यनिहाय लशींची गरज लक्षात घेऊन शिबिरांचे आयोजन द्वितीय व तृतीय स्तरावरील शहरात करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serum institute for vaccination cii cooperation adar poonawalla chief executive officer serum institute of india akp
First published on: 31-07-2021 at 01:38 IST