२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या मोदी सरकारविरोधात मोट बांधण्यासाठी उद्या शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांची भेट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. ममता बॅनर्जी सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते ममता बॅनर्जींना भेटणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २५ जुलैपासून पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीसाठी जाणार आहेत.  या भेटीत नेमकी कोणत्या बाबींवर चर्चा होणार?, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागून आहे. “मी दोन-तीन दिवस दिल्लीत असणार आहे. यावेळी मी राष्ट्रपतींकडून वेळ मिळाल्यास त्यांच्याशी चर्चा करणार आहे. पंतप्रधानांकडून भेटीची वेळ मिळाली आहे”, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं होतं. पश्चिम बंगाल विधानसभा निकालानंतर ही पहिलीच भेट असणार आहे.

ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यातून भाजपा विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न असेल, असंही बोललं जात आहे. या दौऱ्यादरम्यान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलवलेल्या भाजपा विरोधी पक्षांच्या बैठकीतही सहभागी होण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी मोर्चेबांधणी करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

तृणमूल काँग्रेसच्या मुखपत्रातही ‘एबार शपथ, चलो दिल्ली’ याबाबतची घोषणा देण्यात आली आहे. त्यामुळे हा दौरा आणि घोषणेकडे एका नजरेतून बघितलं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar likely to meet mamata banerjee in delhi on july 28 vsk
First published on: 27-07-2021 at 20:08 IST