Shashi Tharoor Tops Survey As Preferred CM Kerala: अलिकडच्या एका सर्वेक्षणानुसार, केरळमध्ये यूडीएफचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेस नेते शशी थरूर यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, तिरुवनंतपुरममधून चार वेळा लोकसभा निवडणूक जिंकलेल्या शशी थरूर यांना २८.३ टक्के लोकांचा पाठिंबा आहे. शशी थरूर यांनी स्वतः याबाबतची एक पोस्ट एक्सवर रीपोस्ट केली आहे. दरम्यान, केरळमधील विधानसभा निवडणुका पुढील वर्षी मे महिन्यात होणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचा (यूडीएफ) सामना सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटशी (एलडीएफ) होणार आहे. ही कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांची एक आघाडी आहे.

केरळ व्होट व्हायब सर्वे २०२६ ने केरळमध्ये सत्ताविरोधी लाट असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचा समावेश असलेली विरोधी आघाडी यूडीएफ एलडीएफसमोर आव्हान उभे करत आहे. याचबरोबर राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) तिसऱ्या पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

सर्वेक्षणानुसार, ३०% पुरुषांनी आणि २७% महिलांनी शशी थरूर यांना पाठिंबा दिला आहे. तर वृद्ध मतदारांमध्येही थरूर यांची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसत आहे. त्यांना ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ३४.२% मतदारांनी पसंती दर्शवली आहे. सर्वेक्षणानुसार, थरूर यांना १८–२४ वयोगटातील २०.३% मतदारांचा पाठिंबा आहे.

दुसरीकडे, सर्वेक्षणात मुख्यमंत्री विजयन यांच्यासमोर कठीण आव्हान असल्याचे दिसून आले आहे. २०२६ च्या निवडणुकीत विजयन यांना मुख्यमंत्रीपदासाठी फक्त १७.५% मतदारांनी पसंती दर्शवली आहे.

केंद्र सरकारच्या धोरणांना काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी जाहीरपणे पाठिंबा दिल्याने थरूर यांचे काँग्रेस नेतृत्वाशी असलेले संबंध ताणले गेले आहेत, अशा वेळी हा सर्वे समोर आला आहे.

खरं तर, केरळ सरकारच्या नवीन औद्योगिक धोरणाचे कौतुक केल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला थरूर यांचे काँग्रेसशी असलेले संबंध पहिल्यांदाच ताणले गेले. त्यामुळे केरळ काँग्रेसमधील त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार शशी थरूर यांचा सध्या काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांशी संघर्ष चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. शशी थरूर यांनी वारंवार सरकारबाबत घेतलेल्या मवाळ भूमिका व पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांचे सहकारी नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकदा थरूर यांच्या सहकाऱ्यांनीच त्यांच्यावर टीका केली आहे. आता पुन्हा एकदा त्यांना सहकाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. थरूर यांच्या आणीबाणीबाबतच्या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते माणिकम टागोर यांनी आक्षेप नोंदवला आहे.