Engineers loosing Jobs due to Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजेन्सने (कृत्रिम बुद्धीमत्ता) अनेक कामं सोपी केली आहेत. मात्र, यामुळे मोठा धोका देखील निर्माण झाला आहे. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या संकटात आहेत. जगभर अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकरकपात करण्यात आली आहे. आर्टिशिफियल इंटेलिजन्समुळे एका मेटाव्हर्स इंजिनिअरला गलेलठ्ठ पगाराची नोकरी गमवावी लागली असून ‘फूड डिलिव्हरी बॉय’ म्हणून काम करावं लागत आहे. त्याच्यावर ओढवलेली परिस्थिती पाहून त्याने सर्वांना इशारा देखील दिला आहे

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दोन दशकांचा अनुभव असलेले ४२ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर शॉन के हे मेटाव्हर्स इंजिनिअर आहेत. ते एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत वरिष्ठ पदावर काम करत होते आणि वार्षिक १,५०,००० डॉलर्स (१.२८ कोटी रुपये) पगार घेत होते. जे आता एका ट्रकमध्ये राहत असून ईबे विक्री आणि फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहेत. आर्टिफिशियल इंजेटलिजन्स बाजारात उपलब्ध झाल्यानंतर त्यांचं काम आता चॅटजीपीटी चुटकीसरशी करू लागलं आहे. त्यामुळे कंपनीने त्यांना कामावरून काढून टाकलं. त्यांना त्यांच्या क्षेत्रात दुसरी नोकरी देखील मिळाली नाही. परिणामी त्यांनी फूड डिलीव्हरीचं काम सुरू केलं आहे.

ज्या क्षेत्रात शॉन के काम करत होते तिथे आता चॅटजीपीटीने हातपाय पसरले आहेत. त्यांनी नोकरी गमावल्यानंतर ८०० ठिकाणी नोकरीचे अर्ज पाठवले होते. त्यापैकी १० कंपन्यांनी त्यांना मुलाखतीसाठी बोलावलं. मात्र, तिथे त्यांना नोकरीची संधी मिळाली नाही. त्यांनी अर्ज पाठवलेल्या कंपन्या किंवा ज्या कंपन्यांनी त्यांचे अर्ज नाकारले, तिथे आता एआयच्या मदतीने एक किंवा दोन एअआय एजंट्स अनेकांचं काम करत आहेत.

शॉन के यांचा जगाला संदेश

शॉन के म्हणाले, “मी एआयच्या विरोधात नाही. मी त्याचं समर्थनच करतो. एआयमुळे लोकांची प्रतिभा अधिक सक्षम व्हायला हवी. मात्र, बाहेर त्याच्या उलट घडतंय. एआय माणसाची जागा घेतंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शॉन के लोकांना इशारा देत म्हणाले, कंपन्या आता खर्च कमी करण्यासाठी कामगारांना हटवून एआय तंत्रज्ञानाची मदत घेत आहेत. हा एक सूचक संदेश आहे. याचा लोकांना फटका बसू शकतो. यापुढेही लोकांच्या नोकऱ्या जातील. एआय आधारित व्यवसाय नवोपक्रम वाढवत नाहीत, यामुळे केवळ महत्त्वकांक्षा वाढतेय, नोकऱ्या मात्र कमी होतायत. कंपन्यांमधील औपचारिक मुलाखती बंद होत आहेत. भरती प्रक्रिया देखील स्वयंचिलत होत आहेत. आपले रेज्युमे कंपन्यांमधील अधिकारी वाचत नाहीत. उलट ते एआय आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने फिल्टर केले जातात.