न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने शीला दीक्षित यांना तीन लाखाचा दंड

भाजप नेते विजेंदर गुप्ता यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात न्यायालयासमोर उपस्थित न राहिल्याने दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना तीन लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

भाजप नेते विजेंदर गुप्ता यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात न्यायालयासमोर उपस्थित न राहिल्याने दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना तीन लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. दीक्षित या दुसऱ्यांदा सुनावणीस उपस्थित राहिल्या नाहीत. पहिल्या अनुपस्थितीबद्दल त्यांना पाच हजार रुपये दंड करण्यात आला होता.
शीला दीक्षित यांच्यावर दंडाची कारवाई करताना महानगर न्यायाधीश नेहा यांनी असे आदेश दिले, की शीला दीक्षित यांना तीन लाख रुपये दंड करण्यात येत असून, त्यातील दोन लाख रुपये त्यांनी दिल्ली राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडे भरावेत, तर एक लाख रुपये गुप्ता यांना द्यावेत. न्यायालयाने दीक्षित यांना पुढील सुनावणीस २० डिसेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.
दीक्षित यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला असून, राजकीय कामामुळे आपल्याला सुनावणीस अनुपस्थित राहण्याची अनुमती मिळावी. गुप्ता यांच्या वकिलाने त्यांच्या विनंतीस विरोध करून शीला दीक्षित यांनी उपस्थित राहिले पाहिजे अन्यथा तो प्रकरण लांबवत नेण्याचा भाग होईल असे मत मांडले.
गेल्या वेळीही त्यांनी अधिकृत दौऱ्याचे कारण सांगितले. भाजपचे विजेंदर गुप्ता यांनी दीक्षित यांच्याविरोधात बेअदबीचा खटला ६ ऑगस्टला भरला होता, तर दीक्षित यांनी गुप्ता यांच्यावर असा आरोप केला, की त्यांनी एमसीडी निवडणुकात आपल्याविरोधात २०१२ मध्ये वाईट भाषा वापरली. वीज कंपन्यांशी साटेलोटे केल्याचा आरोप दीक्षित यांच्यावर करण्यात आला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sheila dikshit slapped with rs 3 lakh fine for non appearance

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी